scorecardresearch

Premium

वन-डे इतिहासात इंग्लंडकडून सर्वोच्च धावसंख्येंची नोंद, ऑस्ट्रेलियासमोर ४८२ धावांचं डोंगराएवढं आव्हान

ऑस्ट्रेलियाचे सर्व गोलंदाज इंग्लंडसमोर हतबल ठरले.

अॅलेक्स हेल्स आणि जॉनी बेअरस्ट्रो, इंग्लंडची शतकी जोडी
अॅलेक्स हेल्स आणि जॉनी बेअरस्ट्रो, इंग्लंडची शतकी जोडी

नॉटिंगहॅम येथे खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वन- डे सामन्यात इंग्लंडने विश्वविक्रमाची नोंद केली.  या सामन्यात इंग्लंडने पुरुष वन-डे इतिहासातली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समाचार घेत इंग्लंडने ५० षटकांत ४८१ धावांचा डोंगर उभा केला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून कांगारुंच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी पहिल्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली. जेसन रॉय माघारी परतल्यानंतर अॅलेक्स हेल्स आणि बेअरस्ट्रो यांनी तुफान फटकेबाजी करत कांगारुंच्या आक्रमणाची धारच काढून घेतली. मधल्या फळीत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननेही ६७ धावांची अर्धशतकी खेळी करुन संघाच्या धावसंख्येत हातभार लावला.

याआधी इंग्लंडने २०१६ साली पाकिस्तानविरुद्ध ४४४ धावांची आक्रमक खेळी केली होती. या सामन्यातही इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने शतकी खेळी केली होती. त्यानंतर आजच्या सामन्यातही अॅलेक्स हेल्सने शतकी खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा निकाल जाणून घेण्यासाठी क्लिक करा

या सामन्यात इंग्लंडच्या नावावर जमा झालेले विक्रम
> इयॉन मॉर्गनने २१ चेंडूत अर्धशतक ठोकले. इंग्लंडच्या फलंदाजाने ठोकलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी इंग्लंडच्या जॉस बटलरच्या नावावर हा विक्रम होता. त्याने २२ पाकिस्तानविरोधात २२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

> मॉर्गनने ६७ धावांची अर्धशतकी खेळी करत वन डे ५, ४४३ धावांचा पल्ला गाठला. मॉर्गनने इयान बेलला मागे टाकले. मॉर्गनने १६७ डावांमध्ये हा पल्ला गाठला. तर इयान बेलने १५७ डावांमध्ये ५, ४१६ धावा केल्या होत्या.

> इंग्लंडने ९. ६२ च्या रन रेटने ४८१ धावा ठोकल्या. इंग्लंडची ही सर्वोच्च धावगती होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: England registered record breaking total of 481 runs in odi cricket against australia

First published on: 19-06-2018 at 22:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×