के एल राहुलने शेअर केला सराव करतानाचा फोटो; पण चर्चा रंगलीये अथिया शेट्टीच्या कमेंटची

भारतीय क्रिकेटर के एल राहुल सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे

England vs India, KL Rahul, Athiya Shetty,
भारतीय क्रिकेटर के एल राहुल सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे

भारतीय क्रिकेटर के एल राहुल सध्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. ऑगस्टमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान के एल राहुल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत असतो. मंगळवारी के एल राहुलने इंस्टाग्रामला सराव करत असतानाचे फोटो शेअर केले होते. यावेळी राहुलने फोटोला कोणतीही कॅप्शन न देता बॅट आणि बॉलचा इमोजी वापरला होता. राहुलच्या या फोटोवर सर्वात आधी कमेंट करणाऱ्यांमध्ये अथिया शेट्टी होती.

अथिया शेट्टीने कमेंटमध्ये रेड हार्ट इमोजी पोस्ट केला. यानंतर राहुलच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. आथियाच्या कमेंटवर सहा हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं असून २८० हून अधिकांनी रिप्लाय दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

दरम्यान के एल राहुलच्या या पोस्टलाही अनेकांनी लाईक केलं आहे. राहुलचा संघातील सहकारी युजवेंद्र चहलनेही इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.


याआधी महिन्याच्या सुरुवातीला राहुल इंग्लंडच्या रस्त्यांवर आथियाचा भाऊ अहान शेट्टीसोबत फिरताना दिसला होता. राहुलने इंस्टाग्रामला फोटो शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

याआधी राहुलने लंडनमधील नाईट आउटचे फोटो इंस्टाग्रामला शेअर केले होते. आथियानेही आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये सारखेच फोटो शेअर केल होते. याशिवाय दोघे एका मित्रासोबतही फोटोत दिसले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

दरम्यान ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: England vs india kl rahul posts pictures from training session athiya shetty reacted sgy

ताज्या बातम्या