पाकिस्तानचा कर्णधार आणि फलंदाज बाबर आजमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम केला आहे. या जागतिक विक्रमातून बाबर आझमने हाशिम अमलाचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. आझमने १३९ चेंडूत १५८ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना आश्चर्यचकित केले होते. दोन्ही फलंदाजांनी १७९ धावांची विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान मोहम्मद रिझवानने ५८ चेंडूत ७६ धावांची तुफानी खेळी खेळली, तर बाबर आझमनेही १४ वे शतक पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबर आझमने शतकासह मोडले ४ विक्रम

एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विक्रम मोडणारे शतक ठोकले. आझमने १३९ चेंडूत १५८ धावा केल्या आणि अनेक जुने विक्रम मोडले. तसेच अनेक नवीन विक्रम देखील नोंदवले. या डावाच्या जोरावर बाबर आझमने चार मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात शतक पूर्ण करत बाबर आझमने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या.  पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात आणि कर्णधार म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रमही त्याने आहे. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही सामन्यात कर्णधाराकडून इतक्या धावा केल्या नव्हत्या त्यामुळे हा सुद्धा विक्रम त्याच्या नावावर झाला.

बाबर आजमने नोंदवला विश्वविक्रम

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात खराब फॉर्मनंतर तिसऱ्या सामन्यात धमाकेदार पुनरागमन करत १४ वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. यासोबत सर्वात कमी डावात १४ एकदिवसीय शतके पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम बाबर आझमच्या नावावर झाला आहे. बाबर आजमने ८१ सामन्यांमध्ये १४ एकदिवसीय शतके पूर्ण केली. वेगवान १४ एकदिवसीय शतकांच्या यादीत २६ वर्षीय हशिम अमला (८४ सामने), डेव्हिड वॉर्नर (९८ सामने), विराट कोहली (१०३ सामने) आणि क्विंटन डी कॉक (१०४ सामने) यांचा समावेश आहे.

एकदिवसीय सामन्यात बाबर आजम पहिल्या क्रमांकावर

आयसीसी वनडे क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने १३९ चेंडूत १५८ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात १४  चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. पाकिस्तानने इंग्लंडसमोर ३३२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु त्यांना ३ गडी राखून पराभव पत्करावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England vs pakistan odi centuries babar azam breaks hashim amla record abn
First published on: 14-07-2021 at 10:40 IST