Euro Cup स्पर्धेसाठी आता ३२ संघांचा विचार!; २०२८ ला नव्या फेररचनेसह होणार स्पर्धा?

यूरो कप स्पर्धेत गेल्या ६० वर्षात अनेक बदल झाले आहेत. आता यूरो कप स्पर्धेत ३२ संघ खेळवण्याचा विचार केला जात आहे.

EURO-Cup-1
Euro Cup स्पर्धेसाठी आता ३२ संघांचा विचार!; २०२८ ला नव्या फेररचनेसह होणार स्पर्धा?

फिफा विश्व चषकानंतर Euro Cup फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे मिनी वर्ल्ड कप म्हणूनही पाहीलं जातं. या स्पर्धेनिमित्त यूरोपातील दिग्गज संघ आमनेसामने असतात. यूरो कप स्पर्धेत गेल्या ६० वर्षात अनेक बदल झाले आहेत. आता यूरो कप स्पर्धेत ३२ संघ खेळवण्याचा विचार केला जात आहे. २०१६ च्या यूरो चषक स्पर्धेत १६ वरून २४ संघ करण्यात आले होते. त्यानंतर यूरो कप २०२० ही स्पर्धाही २४ संघांमध्ये व्यवस्थितरित्या पार पडली. त्यानंतर आता या स्पर्धेत ३२ संघ खेळवण्याचा समितीने विचार सुरु केला आहे. हे ३२ संघ २०२८ च्या स्पर्धेत खेळवले जातील असं सांगण्यात येत आहे. यासाठी एक यूरो कप समितीने अभ्यास गटाची स्थापना केली आहे. यावर २०२३ या वर्षाच्या शेवटी निर्णय घेतला जाईल. तर २०२४ चा यूरो कप २४ संघात खेळवला जाणार आहे. फिफा विश्वचषक २०२६ या स्पर्धेत फिफा समितीने ३२ वरून ४८ संघ खेळवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे आता यूरो कप समितीनेही स्पर्धेची रचना बदलण्यासाठी आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

यूरो कपचा इतिहास

फ्रेंच फुटबॉल फेडरेशनचे व्यवस्थापक हेनरी डेलॉने यांनी १९२७ साली सर्वप्रथम या स्पर्धेची संकल्पना मांडली. त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी UEFA च्या जनरल सेक्रेटरीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या स्पर्धेला पूर्ण स्वरूप प्राप्त होण्यासाठी ३१ वर्षांचा कालावधी लागला. या स्पर्धेचं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते हेनरी डेलॉने यांचं स्पर्धेपूर्वी १९५५ साली निधन झालं. त्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाला खिळ बसते की काय? असा प्रश्न उपस्थित झाला. १९५८ साली या स्पर्धेच्या आराखड्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालं. त्यानंतर पहिल्या यूरो कप स्पर्धेचं १९६० साली आयोजन करण्यात आलं. १९६० साली या स्पर्धेचं नाव ‘यूरोपियन नेशंस कप’ असं होतं. त्यानंतर १९६८ साली या स्पर्धेचं नाव ‘UEFA यूरोपियन चॅम्पियनशिप’ केलं गेलं. हेनरी यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेच्या चषकावर ‘चॅम्पियोनाट डी यूरोप’ आणि ‘कूप हेनरी डेलॉने’ असं नाव कोरण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा चषक तयार करण्याची जबाबदारी हेनरी यांचा मुलगा पिअरे याच्याकडे देण्यात आली होती. २००८ साली यूरो चषकात बदल करण्यात आला. या चषकाचा आकार वाढवण्यात आला. हा चषक ८ किलो वजन असून संपूर्ण चांदीत तयार केला गेलेला आहे.

Euro Cup 2020 स्पर्धेचा आतापर्यंतचा प्रवास; ‘या’ घडामोडींनी वेधलं लक्ष

UEFA Euro Cup जिंकणारे संघ

  • स्पेननं तीनवेळा UEFA Euro Cup आपल्या नावावर केला आहे. १९६४, २००८ आणि २०१२ साली विजय मिळवला आहे.
  • जर्मनीने तीनवेळा UEFA Euro Cup जिंकला आहे. १९७२, १९८० आणि १९९६ साली चषक आपल्या नावावर केला आहे.
  • फ्रान्सने दोन वेळा UEFA Euro Cup आपल्या नावावर करण्यात यश मिळवलं आहे. १९८४ आणि २००० साली त्यांनी या स्पर्धेत बाजी मारली.
  • इटली (१९६८), पोर्तुगल (२०१६), डेनमार्क (१९९२), नेदरलँड (१९८८), ग्रीस (२००४), चेक रिपब्लिक (१९७६) आणि सोवियत यूनियनने (१९६०) या सालात चषक आपल्या नावावर केला आहे.

VIDEO : विजय मिळवताच मेस्सीनं मैदानातच हातात घेतला फोन, अन्….

UEFA Euro Cup फुटबॉल स्पर्धा

१९६० साली आयोजित केलेल्या पहिल्या स्पर्धेत केवळ चार संघांनी सहभाग घेतला होता. चेकोस्लोवकिया, फ्रान्स, सोवियत यूनियन आणि यूगोस्लाविया या देशांचा सहभाग होता. इंग्लंड, पश्चिम जर्मनी आणि इटलीसारख्या संघांनी या स्पर्धेत खेळण्यास लाल दिवा दाखवला होता. त्यामुळे या स्पर्धेसाठी आवश्यक असलेले १६ संघ मिळवणं कठीण झालं होतं. त्यामुळे चार संघात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या स्पर्धेत सोवियत यूनियनने यूगोस्लावियाला पराभूत करत चषक आपल्या नावावर केला होता. १९७६ पर्यंत या स्पर्धेत ४ संघ सहभागी होत होते. १९८० साली पहिल्यांदा ८ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर १९९६ साली या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला. २०१६ साली या स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले. यंदाच्या स्पर्धेतही २४ संघांनी सहभाग घेतला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Euro cup committee plant to expand team involvement in 2028 euro cup rmt

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या