गुणतालिकेतील समीकरणांना धक्का देत इव्हरटॉनने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडवर ३-० असा विजय मिळवला. घरच्या मैदानावर मँचेस्टरविरुद्धचा इव्हरटॉनचा हा सलग तिसरा विजय आहे. प्रीमिअर लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल तीन संघांनाच चॅम्पियन्स लीग स्पर्धेत प्रवेश मिळतो. चौथ्या संघाला पात्रता फेरी खेळावी लागते. इव्हरटॉनच्या विजयाने गुणतालिकेचे चित्रच बदलले आहे.
एव्हरटॉनतर्फे जेम्स मॅक्कार्थी, जॉन स्टोन्स व केव्हिन मिरालास यांनी प्रत्येकी एक गोल केला. इव्हरटॉनच्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेल्सीचा जेतेपदाचा मार्ग सुकर झाला आहे. लिइस्टर सिटीविरुद्ध विजय मिळवल्यास २०१० नंतर चेल्सीचे प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2015 रोजी प्रकाशित
इव्हरटॉनचा मँचेस्टर युनायटेडवर विजय
गुणतालिकेतील समीकरणांना धक्का देत इव्हरटॉनने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडवर ३-० असा विजय मिळवला.
First published on: 27-04-2015 at 04:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everton slams manchester united