Ramiz Raja on Pakistan Team: या विश्वचषकात पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. संघाने नऊ सामन्यांत चार विजय मिळवत आठ गुणांसह पाचव्या स्थानावर या विश्वचषकातील प्रवास संपवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त अफगाणिस्तानकडूनही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघ आणि कर्णधार बाबर आझमवर बरीच टीका होत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला कर्णधारपदावरूनही काढले जाऊ शकते.

२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांना फेव्हरिटपैकी एक मानले जात होते. त्यानंतर भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची घसरण पुढे होतच गेली. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध ९३ धावांनी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेले रमीझ राजा यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानला नंबर वन संघ म्हटले होते. तसेच, बाबर आझमचे वर्णन जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हारिस रौफचे जगातील सर्वात वेगवान आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून वर्णन केले होते. आज त्यांच्यावरच रमीझ राजा यांनी टीका केली आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?

रमीझ राजा म्हणाले की, “जगातील कोणताही फलंदाज हारिसचा चेंडू खेळू शकत नाही. मात्र, या विश्वचषकात या दोघांची कामगिरी अत्यंत खराब झाली. बाबर-हारिसचा फॉर्म आता पहिले सारखा राहिला नाही का त्यांना कुठली दुखापत झाली आहे? हे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट करावे,” असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती.

रमीझ हे पीसीबीचे अध्यक्ष नसल्यामुळे आणि विश्वचषकाच्या समालोचन पॅनेलमध्ये त्याचा समावेश असल्याने त्यांनी यू-टर्न घेत पाकिस्तान आणि बाबर आझम तसेच संपूर्ण संघावर टीका केली आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी या खेळाडूंच्या तंत्रावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले. एवढेच नाही तर त्यांनी शनिवारी इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवानंतर उघडपणे पीसीबीवर टीका देखील केली.

हेही वाचा: PAK vs ENG: इंग्लंडचा शेवट गोड! पाकिस्तानवर ९३ धावांनी दणदणीत विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी झाला पात्र

पाकिस्तान-इंग्लंड सामन्यानंतर अधिकृत प्रसारकांशी संवाद साधताना रमीझ म्हणाले, “या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहता ८०च्या दशकातील क्रिकेट खेळले जात असल्याचा भास होत आहे. आक्रमकता, विचारसरणी आणि डावपेच यात क्रिकेट हे खूप पुढे गेलेले आहे. अशाप्रकारचे क्रिकेट खेळून चांगल्या संघांना पराभूत करू शकतो, असा विचार पाकिस्तान स्वप्नात देखील करू शकत नाही. मला आशा आहे की नकारात्मक गोष्टी आणि चुका दूर केल्या जातील. या संघाला मानसिकदृष्ट्या जागृत होण्याची गरज आहे, कारण पुढच्या विश्वचषकापर्यंत बहुतांश खेळाडू तेच राहतील. त्यात शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम तरुण असल्याने त्यांचा समावेश नक्की असेन.”

रमीझ पुढे म्हणाले की, “सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गोलंदाजांची कामगिरी खराब होती आणि त्यात खूप त्रुटी दिसून आल्या. इतर संघांच्या तुलनेत फिरकी विभाग विकेट्स घेऊ शकेल असला असा वाटला नाही. संघाची फिरकी खेळण्याची क्षमताही संशयास्पद होती. उपखंडातील संघासाठी भारतासारख्या देशात पाकिस्तानी फलंदाज फिरकी गोलंदाजांसमोर अशी फलंदाजी करतील, याची अपेक्षा केली नव्हती. आम्ही अफगाणिस्तासंघाकडून हरलो आणि भारतानेही जबरदस्त पराभव केला. जेव्हा-जेव्हा आक्रमक होण्याची गरज होती, तेव्हा पाकिस्तान अपयशी ठरला. यातून वेळीच सुधारणे गरजेचे आहे.

हेही वाचा: IND vs NED: टाईम आउट वादावर राहुल द्रविडचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “आम्ही असं करणार नाही पण कोणाला दोष…”

शनिवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने विश्वचषकातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपले स्थान निश्चित केले. इंग्लंडने सातव्या स्थानावर आपली मोहीम संपवली. त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकून त्यांचे सहा गुण झाले आहेत आणि २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ते पात्र ठरले आहेत. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ गडी गमावून ३३७ धावा केल्या, त्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षेला धूळ चारली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४३.३ षटकांत २४४ धावाच करू शकला.