scorecardresearch

Premium

दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारताचा ‘गोल्डन बॉय’ मैदानावर उतरण्यास सज्ज

नीरज चोप्रा हा यावेळच्या पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे.

Neeraj Chopra
नीरज चोप्रा – संग्रहित छायाचित्र

भारताचा ऑलिम्पिक हिरो नीरज चोप्रा या आठवड्यात पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी करण्यासाठी सज्ज झाला आहे. फिनलंडमध्ये होणाऱ्या पावो नूरमी गेम्स २०२२ या स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असेल. आज (१४ जून) फिनलंडमधील तुर्कू येथील पावो नूरमी स्टेडियममध्ये पावो नूरमी गेम्स 2022ची सुरुवात होणार आहे. पावो नूरमी गेम्स ही स्पर्धा ही जागतिक अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील दुसरी प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा आहे. डायमंड लीगनंतर पोवो नूरमी गेम्सचा क्रमांक लागतो.

नीरज चोप्रा व्यतिरिक्त, ग्रेनेडाचा विद्यमान जगज्जेता अँडरसन पीटर्स, टोक्यो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेज आणि लंडन २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉल्कोट हे पुरुषांच्या १०-अॅथलीट भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चोप्राचा कट्टर प्रतिस्पर्धी व जर्मन खेळाडू जोहान्स वेटरदेखील तुर्कू येथील स्पर्धेत सहभागी होणार होता. परंतु, त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचे देशबांधव ज्युलियन वेबर आणि अँड्रियास हॉफमन मात्र याठिकाणी येणार आहेत.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

हेही वाचा – IND vs SA 3rd T20 : भारतासाठी ‘करो या मरो’ची स्थिती, विशाखापट्टणममध्ये रंगणार तिसरा टी २० सामना

टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा जवळपास १० महिने स्पर्धांपासून दूर होता. एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर नीरज आता पुन्हा मैदानावर उतरणार आहे. मैदानात आल्यानंतर त्याला जगातील दिग्गज भालाफेकपटूंचा सामना करावा लागणार आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेमध्ये पीटर्स आणि वडलेच या दोघांनीही ९० मीटरचा टप्पा पार केलेला आहे. पीटर्सने दोहा येथे ९३.०७ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते. या हंगामातील हा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे.

नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून नीरज फॉर्ममध्ये परत येण्याचा प्रयत्न करेल. तुर्कूनंतर, नीरज चोप्रा फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर तो डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगसाठी स्वीडनला रवाना होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-06-2022 at 16:14 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×