कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये ब्राझील संघाची नेत्रदीपक कामगिरी सुरूच आहे. सोमवारी (२८ नोव्हेंबर) झालेल्या ग्रुप-जी मधील सामन्यात ब्राझीलने स्वित्झर्लंडचा १-० असा पराभव केला. ब्राझीलच्या विजयाचा हिरो ठरलेल्या कासेमिरोने सामन्यातील एकमेव गोल केला. या विजयासह ब्राझील संघाने अंतिम-१६ फेरी (प्री-क्वार्टर फायनल) गाठली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत झाली आणि दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. जरी ब्राझील संघ स्वित्झर्लंडपेक्षा अधिक आक्रमक फुटबॉल खेळला. परिणामी, हाफमध्ये, ब्राझीलने गोलचे सहा प्रयत्न केले, ज्यामध्ये दोन लक्ष्यावर होते, परंतु गोलरक्षक यान सोमरच्या बचावामुळे त्यांना गोल करण्यापासून वाचवले. दुसरीकडे स्वित्झर्लंडनेही लक्ष्यावर न बसलेल्या गोलवर फटकेबाजी केली. पहिल्या हाफमध्ये बॉल पोझिशनच्या बाबतीत ब्राझीलचा वरचष्मा होता.

उत्तरार्धातही बराच वेळ एकही गोल होऊ शकला नाही. खेळाच्या ६४व्या मिनिटाला व्हिनिसियस ज्युनियरला नक्कीच चेंडू गोलपोस्टमध्ये टाकण्यात यश आले, परंतु व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीआर) ने ऑफसाईड घोषित केले, ज्यामुळे स्कोअर ०-० राहिला. अखेर 83व्या मिनिटाला कासेमिरोला ब्राझीलसाठी गोल करण्यात यश आले. बदली खेळाडू रॉड्रिगोच्या उत्कृष्ट क्रॉसवर कॅसेमिरोने हा गोल केला. या गोलमुळे स्कोअर १-० असा झाला, जो शेवटपर्यंत कायम राहिला.

ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक टिटे यांनी सांगितले की युरोपियन संघावर विजय मिळवूनही स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टार फुटबॉलपटू नेमारची उणीव भासली. त्यांनी नेमारच्या कल्पकतेने खेळण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे इतर खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळते असे नमूद केले.

ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक टिटे यांनी स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “नेमार ज्या स्तरावर आहे त्या स्तरावर पोहोचण्यासाठी इतर खेळाडू प्रयत्नशील आहेत आणि मला आशा आहे की ते तिथे नक्कीच पोहोचतील. आम्हाला नेमारची आठवण येते आणि ती कायम येत राहणार. त्याच्याकडे कल्पकतेने खेळण्याचे कौशल्य आहे, तो प्रचंड प्रभावी आहे म्हणून आम्हाला त्याची आठवण येते, होय. परंतु इतर खेळाडू तो नसताना या संधीचा फायदा करून घेऊ शकतात.”

हेही वाचा :   FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिस ठरला विजयाचा शिल्पकार, उरुग्वेवर मात करत पोर्तुगाल राउंड १६ मध्ये दाखल

टिटे पुढे बोलताना म्हणतात, “नेमारकडे एक वेगळेच कौशल्य आहे. तो एक असा खेळाडू आहे जो एका जादुई क्षणात तुम्हाला मागे टाकू शकतो आणि तुम्हाला प्रश्न पडेल, अरे इथे नेमके काय झाले? त्याच्याकडे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य आहे.” ब्राझीलच्या सर्बियाविरुद्ध पहिल्या विश्वचषक सामन्यात घोट्याला दुखापत झाल्याने नेमारला पुढील सामने खेळता आले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 a chance for others to replace him tite praises neymar less brazil after win over switzerland avw
First published on: 29-11-2022 at 10:17 IST