कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याची वेळ आता तोंडावर आली आहे. हा जेतेपदाचा सामना आज (१८ डिसेंबर) फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. फ्रान्सने उपांत्य फेरीत मोरोक्कोचा २-० असा पराभव केला. त्याचवेळी लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला. ज्यामुळे आज दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

या सामन्यात एमबाप्पे आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू लढताना दिसणार असल्याने अंतिम सामना खूपच काटेरी ठरण्याची शक्यता आहे. तसे, अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील सामना कधी आणि कुठे बघायला मिळणार, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल. याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

अंतिम सामना कुठे खेळवला जाईल?

अंतिम सामना दोहा येथील लुसेल स्टेडियमवर आयोजित केला जाईल. लुसेल स्टेडियम हे देशातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. त्याची क्षमता सुमारे ८९ हजार प्रेक्षक उपस्थितीत राहू शकतील इतकी आहे.

भारतीय वेळेनुसार अंतिम सामना कधी सुरू होईल?

फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांची स्टार्टिंग लाइन-अप जवळपास एक तासापूर्वी समोर येईल.

हेही वाचा – विश्लेषण: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पंचांची कामगिरी वादग्रस्त का ठरली?

फ्रान्स-अर्जेंटिना अंतिम सामना कुठे पाहायचा?

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी चॅनेलवर उपलब्ध असेल. तसेच तुम्ही जियो सिनेमा अॅप आणि त्याच्या वेबसाइटद्वारे फायनल सामन्याचा आनंद देखील घेऊ शकता. यासोबतच तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमवरही मॅचशी संबंधित सर्व अपडेट्स वाचू शकता.

हेही वाचा – विश्लेषण: ‘मुचाचोस’ गीत काय आहे? ते कसे ठरले अर्जेंटिना फुटबॉल संघाचे स्फूर्तिगीत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जेंटिनाला मागील पराभवाचा बदला घेण्याची संधी –

२०१८ च्या विश्वचषकात फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात सामना झाला होता. त्या सामन्यात फ्रान्सने अर्जेंटिनाचा ४-३ असा पराभव केला. फ्रान्सने केलेल्या चार गोलांपैकी दोन गोल किलियन एमबाप्पेने केले होते. त्याचवेळी त्या सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नव्हता. एमबाप्पेने नंतर क्रोएशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही गोल केला होता.