फिफा विश्वचषक २०२२ फायनल जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा एमिलियानो मार्टिनेझ किलियन एमबाप्पेची खिल्ली उडवताना दिसला. अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी चेंजिंग रूममध्ये फ्रान्सवर मिळवलेल्या विजय साजरा केला. अ‍ॅस्टन व्हिला गोलकीपर आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा करताना, फ्रेंच स्ट्रायकरची खिल्ली उडवताना दिसला. मार्टिनेझचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर बरीच टीका होत आहे.

२०२२ विश्वचषक फायनलमध्ये फ्रान्सला पराभूत केल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये डान्स केला. या डान्स दरम्यान सर्व खेळाडू मध्यभागी थांबतात आणि गातात. त्यानंतर काही सेकंद शांत होतात… मग गोलकीपर मार्टिनेझ ओरडतो, “एमबाप्पेसाठी….” यानंतर संघ पुन्हा गाणे म्हणायला सुरू करतो. अर्जेंटिना संघाचा जल्लोष सायंकाळपर्यंत सुरू होता.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Sourav Ganguly's reaction to Hardik
IPL 2024: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांवर सौरव गांगुली संतापला; म्हणाला, ‘त्याला फ्रँचायझीने नियुक्त केले असून…’,

कतारमधील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून मार्टिनेझला अंतिम फेरीनंतर ‘गोल्डन ग्लोव्हज’ देण्यात आले. शूटआऊटच्या विजयात उत्कृष्ट पेनल्टी सेव्हर म्हणून त्याचा लौकिक आणखी वाढला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अर्जेंटिनाचा संघ ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करत आहे. या व्हिडिओमध्ये, मार्टिनेझने सर्वांना थांबण्यासाठी शिट्टी वाजवण्याआधी खेळाडू गाणे म्हणताना आणि गोंधळ करत होते. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तो एमबाप्पेचे नाव घेताना दिसत आहे.

अंतिम फेरीत दोन पेनल्टी वाचवणाऱ्या अर्जेंटिनाच्या एमिलियानो मार्टिनेझला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा ‘गोल्डन ग्लोव्हज’ पुरस्कार मिळाला. मात्र, त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता तो सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाचा बळी ठरत आहे. दुसरीकडे, २३ वर्षीय एमबाप्पेने हरल्यानंतरही आपल्या खेळाने लोकांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा ‘गोल्डन बूट’ पुरस्कारही त्याने पटकावला.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: मेस्सीच्या पत्नीने विजयानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाली, ‘इतकी वर्षे… ‘

सामन्याबद्दल बोलायचे, तर रविवारी रात्री दोहा येथील लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. अतिरिक्त वेळेपर्यंत सामना ३-३ असा बरोबरीत होता. अशा स्थितीत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला, जिथे अर्जेंटिना संघाने ४-२ असा विजय मिळवला. फ्रान्सचा संघ सलग दुसरे जेतेपद पटकावण्यापासून वंचित राहिला. या सामन्यात मेस्सीने २ तर कायलियन एमबाप्पेने ३ गोल केले.