फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अखेर रविवारी साकार झाले. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ ने पराभव करत ३६ वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं. किलियन एम्बापेने हॅट-ट्रीक साधत फ्रान्सला विजय मिळवून देण्याचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला मात्र सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटनेच लागला. या अशा रंगतदार झालेल्या सामन्याचा आनंद अनेक भारतीय नेत्यांनी घेतला. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कतारमध्ये खेळला गेलेला फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना अतिशय रोमहर्षक होता. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात हा सामना झाला. यादरम्यान दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला आणि इथे लिओनेल मेस्सीच्या संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा ४-२ असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. या सामन्याचा आनंद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्याचवेळी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी देखील रविवारी फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आनंद लुटताणाच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. त्यावरच आता फुटबॉलप्रेमींनी मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. ते म्हणतात की, “ अशा मॅच एकटया बघायच्या नसतात, एकत्रित बघायच्या असतात…! असे बिटवीन द लाईन्स कमेंट्स करत गमतीशीर मीम्स करत रिप्लाय केले आहेत. काहींनी तर सामन्यात एवढे गुंग झालात की कोणी तुम्हाला जागे करण्यासाठी तुमच्या शेजारी आले तरी देखील कळणार नाही असे म्हणत अशी एकाग्रता हवी अशी देखील मजेशीर कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिओनेल मेस्सी आणि संपूर्ण अर्जेंटिना संघाचे कौतुक केले. तसेच फुटबॉल विश्वचषक जिंकल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी रविवारी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. “खेळ सीमेपलीकडील लोकांना कसे एकत्र करतो हे या सामन्याने पुन्हा एकदा दाखविल्याचे राहुल गांधी म्हणाले.”