जर्मनीकडून उपांत्य फेरीच्या सामन्यात ७-१ अशा फरकाने हार पत्करल्यामुळे अत्यंत दु:खी झालेला ब्राझीलचा कर्णधार डेव्हिड लुईसने देशवासीयांची माफी मागितली.
‘‘प्रत्येकाची क्षमा मागतो. ब्राझीलच्या सर्व नागरिकांनो, आम्हाला माफ करा. माझ्या देशवासीयांना मला नेहमी आनंदी पाहायचे आहे. समस्त ब्राझीलकरांना किमान फुटबॉलचा मला आनंद देता येणे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. हे तुम्ही जाणता,’’ असे लुईस सांगत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते.
‘‘जर्मनीचा संघ आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होता. त्यांची तयारी चांगली झाली होती, तसेच त्यांचा खेळही चांगला झाला. हा अतिशय दु:खद दिवस आहे; परंतु या अनुभवातून शिकण्यासारखेही बरेच काही आहे,’’ असे लुईस म्हणाला.