बाद फेरीत पोहोचण्याचे वेध फुटबॉलजगतासह आयव्हरी कोस्टलाही लागले आहेत. ‘क’ गटामध्ये एका विजयासह तीन गुणांनिशी आयव्हरी कोस्टचा संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी गटामध्ये तळाला असलेल्या ग्रीसला पराभूत केल्यास त्यांना बाद फेरीत पोहोचता येऊ शकते.
साखळीमध्ये आयव्हरी कोस्टने जपानला पराभूत केले असून कोलंबियाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे, तर दुसरीकडे ग्रीसला कोलंबियाकडून पराभव पत्करावा लागला असून जपानबरोबर त्यांनी बरोबरी केली आहे. त्यामुळे ग्रीसने मोठय़ा फरकाने आयव्हरी कोस्टला पराभूत केले तर त्यांची बाद फेरीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण दोन्ही संघांचा खेळ आणि फॉर्म पाहता तसे होण्याची शक्यता फारच विरळ आहे. दोन्ही संघांचा विचार करता आयव्हरी कोस्टचेच पारडे ग्रीसपेक्षा जड असून ते हा सामना जिंकून बाद फेरीत मुसंडी मारण्याची दाट शक्यता आहे.
सामना क्र. ३८
‘क’ गट : आयव्हरी कोस्ट वि. जपान
स्थळ :  इस्टाडिओ कॅस्टेलाओ, फोर्टालेझा
वेळ :  मध्यरात्री १.३० वा. पासून