Find out Messi Ronaldo's team standings to World Cup cheat math and the current equation | Loksatta

Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत फक्त फ्रान्सला राउंड-१६ साठी पात्रता मिळवता आली आहे. इतर संघांसाठी समीकरण कसे आहे, जाणून घ्या.

Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
फिफा विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत फक्त फ्रान्सला राउंड-१६ साठी पात्रता मिळवता आली आहे. (संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये रोमांचक सामन्यांचा टप्पा सुरूच आहे. सध्याच्या स्पर्धेत ३२ संघ सहभागी होत असून यामध्ये १६ संघ पुढील फेरीत जाणार आहेत. बघितले तर, प्रत्येक सामन्या बरोबरच राउंड-१६ ची समीकरणेही रंजक बनू लागली आहेत. अशा परिस्थितीत, सर्व संघांचे राउंड-१६ मध्ये जाण्याचे समीकरण जाणून घेऊया

ग्रुप-ए: नेदरलँड्सने ग्रुप-एमध्ये कतारविरुद्ध विजय किंवा सामना अनिर्णित राखल्यास तो अंतिम १६ मध्ये प्रवेश करेल. सेनेगलला हरवल्यास किंवा सामना अनिर्णित ठेवल्यास इक्वेडोरही निश्चितपणे पात्र ठरेल. सेनेगलला पुढील फेरी गाठण्यासाठी इक्वेडोरला हरवावे लागेल. पुढील सेनेगल-इक्वाडोर सामना अनिर्णित राहिला, तसेच कतार नेदरलँड्सला पराभूत केले, तर सेनेगल देखील अंतिम-16 मध्ये पोहोचेल.

ग्रुप-बी: या ग्रुपबद्दल बोलायचे तर, इंग्लंडने वेल्सविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात किमान बरोबरी साधली, तर ते पुढील फेरीत जातील. इंग्लंड जिंकल्यास गटात अव्वल स्थान मिळवण्याची खात्री आहे. वेल्सविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला, तरीही ते पुढच्या फेरीत जाऊ शकतात, पण त्यानंतर त्यांना इतर सामन्यांवर अवलंबून राहावे लागेल. इराण आणि अमेरिका यांच्यातील सामना आभासी नॉकआउट असेल, ज्यामध्ये विजयी संघ पुढील फेरीत प्रवेश करेल.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: स्पेनसोबतचा सामना बरोबरीत सुटल्याने चारवेळा चॅम्पियन असलेल्या जर्मनी समोरील अडचणीत वाढ

दरम्यान, वेल्स इंग्लंडला पराभूत करण्यात अपयशी ठरल्यास इराण बरोबरीत जाऊ शकतो. वेल्सने इंग्लंडला हरवले तरी बाद फेरीत जाण्याची खात्री देता येणार नाही. वेल्सला इंग्लिश संघाला किमान चार गोलांच्या फरकाने पराभूत करावे लागेल. तसेच इराण आणि अमेरिका यांच्यातील सामना अनिर्णित राहावा, अशी प्रार्थना करावी लागेल.

सध्या अर्जेंटिनाची ही स्थिती –

ग्रुप-सी: अर्जेंटिनाचा संघ पोलंडविरुद्ध जिंकल्यास पुढील फेरीसाठी सहज पात्र ठरेल. मात्र पोलंडने त्याला हरवले तर अर्जेंटिनाचा संघ अडचणीत येईल. अशावेळी त्याला सौदी अरेबिया आणि मेक्सिको यांच्यातील सामन्याचा निकालही पाहावा लागेल. पोलंडविरुद्ध बरोबरी साधून अर्जेंटिनाही पुढची फेरी गाठू शकतो, पण त्यानंतर अर्जेंटिनाला किमान सौदी अरेबिया आणि मेक्सिकोविरुद्ध बरोबरी किंवा मेक्सिकोला विजय मिळवून द्यावा लागेल.

ग्रुप-डी: फ्रान्सने पहिले दोन सामने जिंकून पात्रता मिळवली आहे. ट्युनिशिया, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यापैकी कोणीही पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाचा सामना डेन्मार्कशी होईल, ज्याचा विजेता संघ पुढील फेरीत पोहोचेल. ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्कचा सामना अनिर्णित राहिला तर ट्युनिशियासाठी दरवाजे उघडतील. अशा स्थितीत ट्युनिशिया फ्रान्सला दोन किंवा अधिक गोलंनी पराभूत करून पुढील फेरी गाठू शकतो.

जर्मनी अशाप्रकारे पात्र ठरू शकतो –

ग्रुप-ई: या ग्रुपचे समीकरण जरा गुंतागुंतीचे आहे. जर्मनीने कोस्टा रिकाला कोणत्याही परिस्थितीत हरवले पाहिजे. जर जर्मन संघाने कोस्टा रिकाला हरवले तर जर्मनीचे चार गुण होतील. मात्र यासोबतच जर्मनीला दुसऱ्या सामन्याचा निकालही पाहावा लागणार आहे. जपानविरुद्धचा सामना स्पेनने जिंकावा अशी जर्मन संघाची इच्छा आहे. या स्थितीत स्पेनचे सात आणि जर्मनीचे चार गुण होतील. अशा स्थितीत जपान आणि कोस्टा रिकाचे केवळ तीन गुण असतील. मात्र या दोनपैकी कोणताही सामना अनिर्णित राहिला तर जर्मनीच्या अडचणी वाढू शकतात.

बेल्जियमही सध्या शर्यतीत –

ग्रुप-एफ: बद्दल बोलायचे झाले तर क्रोएशियाकडून पराभूत होऊन कॅनडा बाहेर पडला आहे. क्रोएशिया बेल्जियमविरुद्ध विजय/ड्रॉसह पात्र ठरेल. क्रोएशिया हरला तरी बेल्जियमने मोरोक्कोला हरवले तरी पात्र ठरेल. कॅनडाविरुद्ध विजय/ड्रॉसह मोरोक्को पात्र ठरेल. क्रोएशियाने बेल्जियमचा पराभव केल्यास तेही पात्र ठरतील. त्याचबरोबर बेल्जियम क्रोएशियाविरुद्धच्या विजयासह पात्र ठरेल.

ग्रुप-जी: मधील चारही संघांना अद्याप पात्र ठरण्याची संधी आहे. हे समीकरण कॅमेरून आणि सर्बिया यांच्यातील सामन्यापूर्वीचे आहे. ग्रुप-जीमध्ये ब्राझील आणि घानाचेही संघ आहेत.

हेही वाचा – FIFA World Cup 2022 : कीशर फुलरच्या गोलने कोस्टा रिकाची जपानवर मात

ग्रुप-एच: मधील चारही संघांना अद्याप पात्र ठरण्याची संधी आहे. ही समीकरणे घाना आणि दक्षिण कोरिया आणि पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील सामन्यापूर्वीची आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 19:49 IST
Next Story
जेलमधल्या सहा महिन्यांच्या मुक्कामात नवज्योत सिंह सिद्धूचं वजन ३४ किलोंनी घटलं; कशामुळे ते वाचा…