जागतिक क्रमवारीत अव्वल आठ स्थानांवर असलेल्या टेनिसपटू वर्ल्ड टूर फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. लंडनमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच, डेव्हिड फेरर, ज्युआन मार्टिन डेल पोट्रो, टॉमस बर्डीच, रॉजर फेडरर, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का आणि रिचर्ड गॅस्क्वेट या आठजणांना वल्र्ड टूर फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. पॅरिस खुल्या टेनिस स्पर्धेत नदालने जेरी जॅन्कोविझवर ७-५, ६-४ असा विजय मिळवला. जोकोव्हिचने अमेरिकेच्या जॉन इस्नरवर अशी ६-७ (५-७), ६-१, ६-२ अशी मात केली. वर्षांत एकाही ग्रँडस्लॅमवर नाव कोरता न आलेल्या रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोहलश्रायबरचा ६-३, ६-४ असा पराभव केला. डेव्हिड फेररने स्पेनच्या निकोलस अल्माग्रोचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. रिचर्ड गॅस्क्वेटने जपानच्या केई निशिकोरीला ६-३, ६-२ असे नमवले.