तैपेई येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिला गटाच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पाच भारतीय बॉक्सिंगपटूंनी उपांत्य फेरी गाठत पदक पक्के केले. सविता (५० किलो), मनदीप संधू (५२ किलो), साक्षी (५४ किलो) यांच्यासह सोनिया (४८ किलो) आणि निहारिका गोन्नेला (७० किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. सविताने रशियाच्या रोडिनोव्हावर ३-० मात केली. मनदीपने हंगेरीच्या नेगी अँजेलावर ३-० असा विजय मिळवला.