मँचेस्टर :फुटबॉलविश्वातील प्रमुख खेळाडू लिओनेल मेसीचा फ्रान्समधील पॅरिस सेंट-जर्मेनबरोबरचा सहवास लवकरच थांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मेसीसमोर यानंतर पर्याय उभे असले, तरी मेसीची माघार पॅरिस सेंट-जर्मेनच्या अस्ताची नांदी असेल, अशी फुटबॉलविश्वात चर्चा आहे.

मेसीच्या समावेशामुळे पॅरिस सेंट-जर्मेनची क्षमता उंचावली होती. मात्र, मेस्सीच्या सौदी अरेबियाच्या भेटीनंतर मेस्सी आणि पॅरिस सेंट-जर्मेन यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. मेसीचा पॅरिस सेंट-जर्मेनबरोबर असलेला करार येत्या काही आठवडय़ांत संपुष्टात येत आहे.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत

पॅरिस सेंट-जर्मेनची मालकी २०११ पासून कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट्सकडे आहे. या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेनने फ्रान्स फुटबॉलमध्ये वर्चस्व राखले. इब्राहिमोव्हिच, किलियन एम्बाप्पे, नेमार, मेसी अशा प्रमुख खेळाडूंना त्यांनी करारबद्ध केले आहे. मात्र, यानंतरही त्यांना अजून चॅम्पियन्स लीग जिंकता आलेली नाही. गेल्या सातपैकी पाच हंगामांत पॅरिस सेंट-जर्मेनला चॅम्पियन्स लीगमधील प्रवास साखळीतच थांबला होता. पॅरिस सेंट-जर्मेनला केवळ २०२० मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नाही. मेसी, एम्बाप्पे, नेमार हे प्रतिभाशाली खेळाडूदेखील हे चित्र बदलू शकले नाहीत. त्यामुळेच आता मेसीच्या बाहेर पडण्याच्या बातमीने पॅरिस सेंट-जर्मेनला तरुण प्रतिभेवर लक्ष केंद्रित करण्याची संधी निर्माण झाली आहे.

पॅरिस सेंट-जर्मेन संघ फ्रान्स लीगमध्ये आघाडीवर असला, तरी चॅम्पियन्स स्पर्धेतील अपयशाने स्थानिक स्पर्धेतील महत्त्व कमी होत आहे. सांघिक खेळाच्या जोरावर नव्हे, तर खेळाडूंच्या वैयक्तिक गुणवत्तेवरच पॅरिस सेंट-जर्मेनचे आव्हान टिकून राहिले आहे.