ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार टीम पेनने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पेनने शेवटचा सामना शेफिल्ड शील्डमध्ये क्वीन्सलँडविरुद्ध खेळला. सामन्यानंतर तस्मानिया संघाने त्याला गार्ड ऑफ ऑनर देऊन क्रिकेटमधील त्याच्या योगदानाचे स्मरण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर स्टीव्ह स्मिथचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर पेन ऑस्ट्रेलियाचा ४६ वा कसोटी कर्णधार बनला. आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमनाचे सर्व दरवाजे बंद होण, अ‍ॅलेक्स कॅरीचे यष्टिरक्षक म्हणून संघातील स्थान निश्चित करणे, विविध वादात अडकणे ही त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याची प्रमुख कारणे ठरली आहेत.

टिम पेनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

पेनने कसोटी क्रिकेटमध्ये ३५ सामने, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५ सामने आणि ऑस्ट्रेलियासाठी १२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत १५३४ धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये ८९० धावा आणि टी-२० क्रिकेटमध्ये ८२ धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटसह पेनने फक्त १ शतक झळावले आहे. त्‍याने कसोटीमध्‍ये ९ अर्धशतकं आणि एकदिवसीयमध्‍ये ५ अर्धशतकं केली आहेत. टी-२० क्रिकेटमध्‍ये तो एकही मोठी खेळी खेळू शकलेला नाही.

सॅंडपेपरच्या वादानंतर कर्णधार झाला होता –

२०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट वाद निर्माण झाला होता, ज्याला सँडपेपर स्कँडल असेही म्हटले जाते. यानंतर टीम पेनला कर्णधार बनवल्यानंतर त्याने संघाला चांगल्या पद्धतीने हाताळले. तसेच संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढले. टीम पेन गेल्या वर्षी एका वादात सापडला आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्याचा आनंद लुटण्यासाठी अभिनेता रजनीकांत उपस्थित, फोटो व्हायरल

पेनवर क्रिकेट तस्मानियामध्ये काम करणाऱ्या एका मुलीला स्वतःचे अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप होता. हे प्रकरण २०१७ चे आहे पण गेल्या वर्षी ऍशेसच्या आधी त्याचे फोटो व्हायरल झाले होते. हे जुने प्रकरण समोर आल्यानंतर पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former australia captain tim paine has announced his retirement from cricket vbm
First published on: 17-03-2023 at 17:17 IST