Dipendra Singh Airee Creates History : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने शनिवारी (१३ एप्रिल) जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली. त्याने कतार विरुद्ध एसीसी पुरुष टी-२० इंटरनॅशनल प्रीमियर लीग कपमध्ये बॅटने कहर केला आहे. दीपेंद्रने ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारताचा युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड यांनी ही कामगिरी केली होती.

३०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने केल्या धावा –

या सामन्यात नेपाळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २० षटकात ७ गडी बाद २१० धावा केल्या. या संघासाठी दीपेंद्र सिंगने २१ चेंडूत ६४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने आपल्या स्फोटक खेळीत ३ चौकार आणि ७ षटकार मारले. दीपेंद्रने ३०४.७६ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्यांच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज आसिफ शेखने ४१ चेंडूत ५२ धावा आणि कुशल मल्लाने १८ चेंडूत ३५ धावा केल्या.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
sharad pawar
आघाडीत बिघाडी? मित्रपक्षाचं शरद पवारांना पत्र; प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करत म्हणाले, “काँग्रेसच्या चुकांचं पापक्षालन…”
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?

युवराज आणि पोलार्डच्या क्लबमध्ये दीपेंद्र सामील –

नेपाळच्या डावातील शेवटच्या षटकात दीपेंद्रने कामरान खानची धुलाई केली. त्याने कतारचा गोलंदाज कामरानच्या सर्व सहा चेंडूंवर षटकार ठोकले. दीपेंद्रच्या आधी युवराज सिंग आणि किरॉन पोलार्ड यांनी टी-२० इंटरनॅशनलमध्ये सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. युवराजने २००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात इंग्लंडविरुद्ध सहा षटकार मारले होते. त्याचवेळी, पोलार्डने २०२१ मध्ये अकिला धनंजयच्या चेंडूवर श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – PBKS vs RR : राजस्थानसाठी IPL पदार्पण करणारा कोण आहे तनुष कोटियन? ज्याने १०व्या क्रमांकावर झळकावलंय शतक

दीपेंद्रचा सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम –

दीपेंद्रच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान मंगोलियाविरुद्ध हँगझोऊ येथे त्याने ९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. दीपेंद्र ३०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह टी-२० क्रिकेटमध्ये दोनदा अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने मंगोलियाविरुद्ध १० चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या होत्या.