ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जेमी मिशेल यांनी १९८५ साली झालेल्या श्रीलंका आणि भारत दौऱ्यादरम्यान आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा दावा केलाय. त्यावेळेस १९ वर्षांखालील संघाचा सदस्य असणारे जेमी आता ५५ वर्षांचे आहेत. ऑस्ट्रेलिया ब्रॉडकास्टिंग कॉर्परेशनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे गंभीर आरोप केले आहेत. एका जखमेवर उपचार करताना एका डॉक्टरने आपलं लैंगिक शोषण केल्याचं जेमी यांनी म्हटलंय. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या आरोपांच्या आधारे तपास सुरु केला आहे. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणामध्ये आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करु असं म्हटलंय.

जेमी मिशेल यांनी संघाचा एक फोटो ऑनलाइन पाहिल्यानंतर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून यासंदर्भातील स्पष्टीकरण मागण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील माहिती त्यांनी सरकारच्या सूचना आणि भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहार विभागाला दिली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. एबीसीच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मिशेल यांनी, “अखेर त्या १९८५ च्या दौऱ्याची चौकशी होत असल्याने या प्रकरणात मला थोडा दिलासा मिळाला आहे. तो दौरा माझ्या क्रिकेट करियरमधील मुख्य आकर्षण होण्याऐवजी पुढील अनेक वर्ष मला ताण तणाव देणारा आणि मानसिक धक्का देणारा ठरला,” असं म्हटलंय.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

मिशेल यांनी यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सहा प्रश्न विचारले आहेत. या दौऱ्यासंदर्भातील अहवाल तसेच त्यावरील कारवाई आणि मेडिकल रेकॉर्डचं काय करण्यात आलंय, याची माहिती मिशेल यांनी मागवलीय. अहवालानुसार कोलंबोमध्ये ३० मार्चच्या रात्री मिशेल यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते संघाच्या डॉक्टरकडे गेले. तिथे त्यांना इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर मिशेल हे जवळजवळ १० तास बेशुद्धावस्थेत होते.

रात्री कोणी मिशेलच्या रुममध्ये जाऊ नये असं माझ्या सहकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं, असंही मिशेल यांनी म्हटलं आहे. या कालावधीमध्ये संघाशी संबंधित एका मुख्य अधिकाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा दावा मिशेल यांनी केलाय. पण नक्की काय घडलं याची सविस्तर माहिती मिशेल यांनी दिलेली नाही. या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी आमची संघटना खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध असल्याचं म्हटलंय.

“आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सर्वसमावेशक, सुरक्षित आणि दुसऱ्यांना मदत करणारी संस्कृती असणारी संघटना म्हणून पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जेमी मिशेल यांनी हिंमत दाखवून हे आरोप आणि घटना संघटनेसमोर मांडल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पोलीस तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करु,” असं हॉकले म्हणालेत. मात्र त्याचवेळी त्यांनी गहाळ झालेल्या कोणत्याही कागदपत्रांबद्दल आपल्याला कसलीही माहिती नसल्याचं स्पष्ट केलंय.