भारताचा माजी डावखुरा क्रिकेटपटू विनोद कांबळीची फसवणूक झाली आहे. केवायसी अपडेट करण्याचे कारण देत कांबळीच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी १ लाख १३ हजार ९९८ रुपये काढून घेतले. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की प्रकरण काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ डिंसेबर रोजी विनोद कांबळीच्या मोबाइलवर एका व्यक्तीने फोन केला. कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक त्याने अकाउंटचे केवायसी अपडेट नसल्याची माहिती दिली. केवायसी अपडेट झाले नाही, तर अकाउंटमधील व्यवहार बंद होतील असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे कांबळीने ऑनलाइन केवायसी अपडेट करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – खळबळजनकच..! टीम इंडियापासून वेगळं होताच रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘‘BCCIमधील काही लोकांना…”

त्या व्यक्तीने कांबळीच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवरील जाऊन एनीडेस्क अॅप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी देण्यास सांगितले. ओटीपी देताच त्या व्यक्तीने कांबळीच्या मोबाइलचा एक्सेस घेतला आणि पैसे काढून घेतले. याबाबत विचारणा करताच समोरील व्यक्तीने कांबळीसोबतचा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे कळताच कांबळीने पोलीस ठाणे गाठले.

विनोद कांबळीची कारकीर्द

१८ जानेवारी १९७१ रोजी मुंबईत जन्मलेल्या विनोद कांबळीने १९९१ मध्ये वनडे आणि १९९३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कांबळीची कारकीर्द फारशी पुढे जाऊ शकली नाही. ऑक्टोबर २००० नंतर त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. २००९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत, कांबळीने १७ कसोटी सामन्यांच्या २१ डावांमध्ये ५४.२० च्या सरासरीने एकूण १०८४ धावा केल्या. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, कांबळीने १०४ सामन्यांच्या ९७ डावांमध्ये २४७७ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २ शतके आणि १४ अर्धशतके केली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer vinod kambli cheated by cyber thieves under the pretext of updating his kyc adn
First published on: 10-12-2021 at 13:30 IST