scorecardresearch

Premium

Legends Cricket League : निवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यातच पुनरागमन करणार इंग्लंडचा दिग्गज खेळाडू

गेल्या आठवड्यामध्ये ‘लिजेंड्स क्रिकेट लीग’ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे.

Eoin Morgan
फोटो सौजन्य – इऑन मॉर्गन इन्स्टाग्राम

इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या जागी कर्णधार म्हणून बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांची वर्णी लागली आहे. मात्र, निवृत्ती घेतल्यानंतर काही महिन्याच मॉर्गन क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहे. आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून देणारा इऑन मॉर्गन लिजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहे.

गेल्या आठवड्यामध्ये ‘लिजेंड्स क्रिकेट लीग’ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेत चार संघ सहभागी होणार असून ११० आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांसारखे माजी भारतीय क्रिकेटपटूदेखील लेजेंड्स क्रिकेट लीगच्या (एसएलसी) दुसऱ्या सत्रात खेळताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन आणि इंग्लंडचा इयॉन मॉर्गनदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

हेही वाचा – IND vs ENG 1st ODI: टायगर पतौडींचा नातू शोभतो! एमएस धोनी आणि गॉर्डन ग्रीनिजसोबत बसून तैमुरने बघितला क्रिकेट सामना

एलएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ११० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला त्यांची चार संघांमध्ये विभागणी केली जाईल. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्याबाबत मॉर्गन म्हणाला, “ही खूप आनंदाची गोष्टी आहे आणि मी लीगचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former england captain eoin morgan will participate in legends cricket league season 2 vkk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×