टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी संघासोबत ७ वर्षे घालवली. त्यांनी आपले अनुभव चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. श्रीधर यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये घालवलेली ही वर्षे त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले. श्रीधर म्हणाले, ”कोचिंग दरम्यान संघाची खराब कामगिरी ही खरेतर प्रशिक्षणासाठी एक आश्चर्यकारक संधी असते.” श्रीधर हे रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षक प्रणालीचा महत्त्वाचा भाग होते. संघाची क्षेत्ररक्षण पातळी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीधर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अॅडलेड (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांत सर्वबाद) आणि लीड्समधील (७८ धावांत सर्वबाद) खराब कामगिरीबाबत मत दिले.

श्रीधर म्हणाले, “प्रशिक्षणाच्या संधींचा अर्थ म्हणजे खेळाडूंना समजून घेणे, त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करणे, त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना तांत्रिक आणि मानसिक प्रशिक्षण देण्याची संधी देणे. यावरून खेळाडू आणि संघाची कल्पना येते. मुख्यतः वाईट दिवसातील तुमचे वागणे तुमचे व्यक्तिमत्व सांगते.”

माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत, का असे विचारले असता, श्रीधर म्हणाले, ”सर्वोत्तम निकाल किंवा निर्णयासाठी मतभेद महत्त्वाचे आहेत. मी, रवीभाई (शास्त्री), भरत सर किंवा आधी संजय (बांगर) आणि नंतर विक्रम (राठौर) यांच्यात नेहमी मतभेद असायचे. पण आम्ही सर्व एकाच ध्येयासाठी काम करत होतो. यामध्ये कधी दोन लोकांचे एकमत होते, कधी नसते. आमची मते नाकारली गेली असे आम्हाला कधीच वाटले नाही.”

हेही वाचा – ‘‘कपिल देव यांना भारतरत्न देण्यात यावा”, वाचा कोणी केलीय ही मागणी

रवी शास्त्रींचे कौतुक करताना श्रीधर म्हणाले, ”तुम्ही रवीभाई यांना कधीही खेळाशी संबंधित सूचना देऊ शकता आणि ते ते नाकारणार नाहीत. त्याच्याकडे नेतृत्व गुण आणि उत्कृष्ट मानवी व्यवस्थापन कौशल्ये आहेत. संघाच्या हिताचा कोणताही निर्णय बोर्डाला कळवण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याची उंची मोठी होती आणि त्यांना खेळाडूंची मानसिकता चांगलीच समजली होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघातील मोठ्या खेळाडूंशी जुळवून घेण्याबाबत श्रीधर म्हणाले, “माझ्यासाठी सर्व खेळाडू सारखेच आहेत. आमच्या कोणत्याही खेळाडूला अहंकार नाही आणि ते साधे आहेत. त्यांच्याशी संवाद साधलात, तर अडचण येणार नाही. ते सूचनांचे स्वागत करतात आणि खेळाच्या धोरणावर चर्चा करू इच्छितात.”