पाकिस्तानी क्रिकेटर सोहेल खान क्रिकेटर सध्या भारतात ट्रेंड करत आहे. हा क्रिकेटर कोण आहे हे तुम्हाला माहीतही नसेल, पण विराट कोहलीबद्दल या खेळाडूने असे काही बोलले जे त्याच्या उंचीला शोभत नाही. भारताला दोन विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरबद्दल तो म्हणाला की, मी त्याला ओळखत नाही. त्यानंतर भारताविरुद्धही विष ओकले, पण त्यानंतर चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोहेल खानला क्रिकेटमध्ये फारसे लोक ओळखत नसतील, कारण त्याची कारकीर्दही फार मोठी नव्हती. त्याने पाकिस्तानसाठी ९ कसोटी, १३ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळले आहेत. क्रिकेट जगतात विराट कोहलीचा मान त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे, तरीही सोहेल खानने त्याच्याबद्दल असे म्हटले की, पाकिस्तानचे जागतिक दर्जाचे खेळाडूही हे मान्य करणार नाहीत. विराटची ओळख करून देण्याची गरज नाही.

टी२० विश्वचषक २०२२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सर्वांना आठवत असेल, ज्यामध्ये विराटने सामना जिंकणारी खेळी खेळली होती. हॅरिस रौफला लगावले लागोपाठ २ षटकार सर्वांना आठवत असतील, त्यापैकी दुसरा षटकार त्याने समोरच्या दिशेने मारला होता. कोहलीने त्या षटकाराबद्दल सांगितले होते की, त्याच्या कारकिर्दीत असे कनेक्शन फक्त २-३ वेळा झाले आहे. हॅरिस रौफने स्वतः त्या शॉटचे अनेकवेळा कौतुक केले आहे. पण त्या शॉटमध्ये सोहेल खानला काही खास वाटले नाही.

हेही वाचा – IND vs NZ 3rd T20: ‘मी माझे शब्द मागे घेतो…’, शुबमन गिलच्या शतकानंतर माजी खेळाडूची प्रतिक्रिया

तो शॉट फार कठीण नव्हता, असे सोहेल खानने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. त्याने फक्त स्वतःसाठी जागा बनवली आणि पुढे शॉट मारला. तो हार्ड लेन्थ बॉल होता, तो कव्हरच्या दिशेनेही मारू शकला असता. एका चांगल्या चेंडूवर तो चांगला शॉट होता. एवढेच नाही तर रोहित शर्मा त्याच्यापेक्षा चांगला असल्याचे सोहेल खानने सांगितले. तो म्हणाला, विराट चांगला फलंदाज आहे, पण रोहित त्याच्यापेक्षाही सरस आहे. रोहित तांत्रिकदृष्ट्या चांगला आहे. रोहितने १०-१२ वर्षे क्रिकेटवर राज्य केले आहे.

विराट कोहलीबद्दल सोहेल खान म्हणाला, एकदा कोहली माझ्याकडे आला आणि म्हणाला, नवीन खेळाडू असूनही मी खूप बोलतो. म्हणून मी त्याला म्हणालो, बेटा, जेव्हा तू अंडर-१९ खेळत होतास तेव्हा मी पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेट खेळत होतो.

गौतम गंभीरशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना सोहेल खान म्हणाला, “मला वाटत नाही की लोक गंभीरचे ऐकत असतील किंवा त्याचे पाकिस्तानबद्दल काय मत आहेत.” कोण गंभीर आहे हे देखील मला माहित नाही. आता लोकांनी यावर त्याचा शाळा घेतली आहे. भारतीय चाहते त्याला आधीच शिव्या देत होते. लोक म्हणाले, गंभीर दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघात होता आणि त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले पण तू कोण आहेस?

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistani cricketer sohail khan has poisoned virat kohli and gautam gambhir vbm
First published on: 02-02-2023 at 16:19 IST