Gautam Gambhir Secret: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजीचा माजी मुख्य प्रशिक्षक वसीम अक्रम यांनी स्पोर्ट्सकीडाच्या ‘मॅच की बात’ या कार्यक्रमात गौतम गंभीरचं एक टॉप सिक्रेट उघड केलं आहे . गौतम गंभीरचा हा एक हट्ट पुरवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे असेही अक्रमने म्हटले आहे. गौतम गंभीरने २०११ ते २०१७ दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते. माजी भारतीय सलामीवीराच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये दोनदा आयपीएल चॅम्पियन पद मिळवले होते. तर, वसीम अक्रम २०१० मध्ये केकेआर कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला होता व २०१६ पर्यंत त्याने संघासह काम केले होते. यादरम्यानचीच एक आठवण त्याने मॅच की बात कार्यक्रमात शेअर केली आहे.

वसीम अक्रमने सांगितले की, “गौतम गंभीरला अंकशास्त्रावर खूप विश्वास आहे. त्यामुळे, राहत्या हॉटेलच्या रुम नंबरमध्ये नऊ अंक असावा यासाठी गंभीर नेहमी आग्रह धरायचा. त्याची सध्या लोकांच्या मनातील प्रतिमा वेगळी आहे पण गौतम गंभीर हा साधा, सरळ माणूस आहे. समजून घ्यायला सोपा आहे, त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर चांगला आहे. तो खूप शांत व खूप सरळ विचारांचा आहे. हे सगळं खरं असलं तरी त्याच्या नऊ क्रमांकाच्या खोलीच्या आग्रहामुळे दौऱ्यांच्या वेळी त्याच्यासाठी खोली शोधताना खूप अडचणी यायच्या. त्याला ९, ४५ किंवा ३६ अशा नऊ क्रमांक असलेल्याच खोलीत राहायचे असायचे. आता त्याचं कारण काय हे रहस्यच आहे.”

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Jake Fraser Mcgurk Statement on Jasprit Bumrah
IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”

अक्रम असेही म्हणाला की, “मी गौतमबरोबर बराच वेळ घालवला आहे. आशिया चषकाच्या पॅनलमध्येही आम्ही एकत्र होतो. मला गौतमबद्दल एक गोष्ट आवडते ती म्हणजे तो एक नेता, कर्णधार म्हणून उत्तम आहे. नेहमी आघाडीवर राहून लढतो.” गौतम गंभीरने यापूर्वी २०२२ आणि २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा मार्गदर्शक म्हणून काम केलं होतं.

हे ही वाचा<< ऋतुराज व दुबेची तुफान फलंदाजी चालू असताना धोनी का चिडला? कॅमेरा बघितला, बॉटल उचलली आणि.. पाहा Video

सध्याची केकेआरची स्थिती पाहिल्यास श्रेयस आतापर्यंत त्यांनी सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. गेल्या दोन हंगामात अपयशी ठरल्यावर आता यंदा अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ सध्या आयपीएल पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असल्याने प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. केकेआरचा पुढील सामना ईडन गार्डन्समध्ये शुक्रवारी २६ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.