ख्रिस गेलच्या वादळी खेळीमुळे वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेचे १६६ धावांचे उद्दिष्ट पार करताना गेलने ड्वेन स्मिथसह ७८ धावांची सलामी दिली. त्यानंतर मार्लन सॅम्युअल्ससह ३६ धावा जोडत गेलने वेस्ट इंडिजला विजयासमीप आणून ठेवले. गेलने ३१ चेंडूंत पाच चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी करत ७७ धावा फटकावल्या. सॅम्युअल्सने पाच चौकार आणि एका षटकारानिशी ४१ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजचे पाच बळी ठरावीक अंतराने बाद झाले, मात्र चार बळी शिल्लक राखून त्यांनी विजय साकारत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.