सुरेश रैना बरोबरील वाद प्रकरण भोवणार
वेस्टइंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत विडिंजविरुद्धच्या सामन्यात झेल सोडल्याने सुरेश रैनाबरोबर वाद घातलेल्या रवींद्र जडेजाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) फटकारले आहे. बीसीसीआयने या प्रकरणी जडेजाला लेखी खुलासा देण्यास सांगितले आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, जडेजासह भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि व्यवस्थापक रणजीब मिश्रा यांनाही लेखी खुलासा देण्यास सांगितले आहे.
तिरंगी मालिकेत वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या भारतासाठी ‘करो या मरो’ परिस्थिती असलेल्या सामन्यात फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने झेल सोडला आणि जडेजाला राग सहन झाला नाही. मैदानावरच झेल सोडल्याच्या कारणावरून या दोघांमध्ये जुंपली व अखेर कर्णधार विराट कोहलीने हस्तक्षेप करून दोघांना बाजूला केले होते. याप्रकरणाची दखल घेत बीसीसीआयने जडेला लेखी कारण देऊन झालेल्या प्रकरणाचा खुलासा करण्यास सांगितले आहे.