ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याचा शनिवारी रात्री मेलबर्नमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान त्याचा अपघात झाला आहे. या अपघातात त्याचा पाय मोडला. पायाच्या दुखापतीमुळे तो तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. ही बातमी आयपीएल २०२३ च्या चार महिन्यांपूर्वी आली आहे. त्यामुळे मॅक्सवेल आरसीबी संघाकडून खेळताना दिसणार नाही.

मॅक्सवेल त्याच्या गावी मित्राच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. ऑस्ट्रेलियन मीडियाने वृत्त दिले की तो एका मित्राच्या घरी टेनिस कोर्टवर धावत असताना दोघे घसरले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्राच्या खाली पाय अडकल्याने मॅक्सवेलचे हाड मोडले.

या विचित्र अपघातामुळे स्फोटक अष्टपैलू खेळाडूच्या डाव्या पायाच्या हाडाला फ्रॅक्चर झाले आहे. रविवारी दुपारी मॅक्सवेलचा पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तो आता बरा होईल आणि दोन ते तीन महिने खेळापासून दूर राहण्याची शक्यता आहे. हा अपघात पार्टीच्या सुरुवातीलाच घडला आणि त्यावेळी मॅक्सवेल किंवा त्याचे मित्र मद्यधुंद अवस्थेत नव्हते, असेही वृत्त आहे.

ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, ‘ग्लेन मॅक्सवेल हा खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याचा खूप वाईट अपघात झाला. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. मर्यादित षटकांमध्ये तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो लवकर बरा व्हावा आणि संघात पुनरागमन करावे यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅक्सवेलच्या जागी वेगवान गोलंदाज शॉन अॅबॉटचा संघात समावेश करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी चार डावात ३९.३३ च्या सरासरीने एकूण ११८ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १६० च्या वर होता आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद ५४ होती.

हेही वाचा – PAK vs ENG Final: एबी डिव्हिलियर्सची भविष्यवाणी; सांगितले, पाकिस्तान आणि इंग्लंडपैकी कोण नेणार ट्रॉफी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, शॉन अॅबॉट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा