इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाने दिल्ली डायनामोस संघावर २-० अशी मात करत विजयी सलामी दिली.

तिसऱ्याच मिनिटाला दिल्लीच्या सौव्हिक चक्रवर्तीच्या हातून झालेल्या स्वयंगोलमुळे गोव्याचे खाते उघडले. या गोलमुळे दिल्लीने बचावात्मक पवित्रा स्वीकारला. ४५व्या मिनिटाला रेइनाल्डो डा क्रुझने गोल करत गोवा संघाला आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत दिल्लीने गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र गोव्याने बचाव अभेद्य करत गोल होऊ दिला नाही. गेल्या हंगामात दिल्लीला गोव्याविरुद्धच्या दोन्ही लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र महान खेळाडू झिको यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याने रॉबटरे कालरेसच्या दिल्लीला वरचढ होऊ दिले नाही.