भारतीय हॉकीचे उच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्ट्समन यांच्याकडे हॉकी इंडियाचे मुख्य समन्वयक पदाचीही सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्याकडे २०१६पर्यंत ही जबाबदारी राहणार आहे.
पहिल्यांदाच हॉकीकरिता शासनाने उच्च कामगिरीसाठी एवढे मोठे पद तयार करत काही विशिष्ट जबाबदारी सोपवली आहे. ओल्ट्समनकडे सबज्युनिअर, ज्युनिअर व वरिष्ठ संघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संघांसाठी दीर्घकालीन योजना तयार करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक प्रशिक्षकांचा अभ्यासक्रमही त्यांनीच करावयाचा आहे.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरींदर बात्रा म्हणाले, ‘‘शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. शासनाने आता ओल्ट्समन यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2013 रोजी प्रकाशित
ओल्ट्समनकडे मुख्य समन्वयकपदाची सूत्रे
भारतीय हॉकीचे उच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्ट्समन यांच्याकडे हॉकी इंडियाचे मुख्य समन्वयक पदाचीही सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

First published on: 19-10-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt appoints oltmans as indian hockeys high performance director