ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने एक संक्षिप्त निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांचा थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

आजच्याच दिवशी क्रिकेटपटू विराट कोहली आपल्या कारकीर्दीतील शतकी कसोटी सामना खेळला आहे. शेन वॉर्ननेही कोहलीमुळे कसोटी क्रिकेट सुरक्षित आहे असे म्हटले होते. विराट कोहलीने भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट सुरक्षित राहील, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने स्तुती केली होती.

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

‘‘कोहली कायमच कसोटी क्रिकेटला प्राधान्य देतो. भारतीय संघातील खेळाडूंना कोहलीकडून प्रेरणा मिळते. प्रत्येक खेळाडू त्याचा आदर करतो. त्यांचा कोहलीला पूर्ण पाठिंबा आहे. त्याच्यात आणि खेळाडूंमध्ये उत्तम समन्वय आहे. कर्णधार म्हणून संघातील प्रत्येक खेळाडूने तुमच्यासाठी खेळणे अत्यंत गरजेचे असते. कोहलीचा मैदानातील वावर पाहिल्यावर आपण सर्वानी त्याचे आभार मानले पाहिजेत असे मला वाटते,’’ असे वॉर्नने म्हटले होते.

ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यातन भारताने इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत केल्यानंतर शेन वॉर्नने प्रतिक्रिया दिली होती. ‘‘कोहलीने ज्या प्रकारे भारतीय संघाचे नेतृत्व केले, ते वाखाणण्याजोगे होते. आपण हा सामना जिंकू शकतो, असा त्याने त्याच्या संघातील खेळाडूंना विश्वास दिला. कोहलीने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला असून भारतीय संघाचा खेळ पाहताना मजा येते. कोहली असेपर्यंत कसोटी क्रिकेट मागे पडण्याची चिंता नाही. तो बराच काळ क्रिकेट खेळले अशी आशा करतो,’’ असेही वॉर्नने म्हटले होते.

वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने १५ वर्षे क्रिकेटच्या मैदानावर राज्य केले. १९९९ चा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचाही तो सदस्य होता. त्याला अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. १९९३ ते २००३ पर्यंत पाच वेळा ऍशेस मालिका जिंकणाऱ्या संघाचाही तो भाग होता.