Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये महिला प्रीमियर लीगचा नववा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा होत आहे. गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातकडून कर्णधार स्नेह राणा तर दिल्ली कॅपिटल्ससाठी मेग लॅनिंग नेतृत्व करत आहे. गुजरातच्या सलामीवीर फलंदाज सबिनेनी मेघना आणि लॉरा वॉलवर्थ स्वस्तात माघारी परतल्या. मारिजन कॅपने भेदक गोलंदाजीचा मार करत गुजरातच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पॉवर प्ले मध्ये सहा षटकांत ३१ धावांवर गुजरातने ५ विकेट्स गमावल्या होत्या. कारण दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाज मारिझान कापने गुजरातच्या ५ फलंदाजांना तंबूत पाठवलं. पण हरलीनने २० तर जॉर्जियाने २५ धावा करत गुजरातचा डाव थोडाफार सावरला. त्यानंतर किम गर्थ सावध खेळी करून ३७ चेंडूत ३२ धावा करत नाबाद राहिली. दरम्यान, गुजरात जायंट्सने २० षटकात १०५ धावा करत ९ गडी गमावले.

IPL 2024 Travis Head Breaks Many Records with 89 Runs innings against Delhi Capitals
IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

नक्की वाचा – अहमदाबाद कसोटी सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचं काय होणार? ‘असं’ असेल WTC फायनलचं संपूर्ण गणित

गुजरातसाठी मैदानात फलंदाजीला उतरलेल्या सलामीवीर सबिनेनी मेघनाला भोपळाही फोडता आला नाही. लॉरा वॉलवर्थने फक्त एक धाव केली. कारण मारिझान कापने या दोन्ही फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर हरलीन देओलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हरलीनने १४ चेंडूत २० धावा केल्यानंतर पुन्हा एकदा मारिझानने हरलीनला पायचीत करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर दयालन हेमलता ५ धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर कापच्या शेवटच्या षटकात सुष्मा वर्माची दांडी गुल झाली. सुष्माने १० चेंडूत फक्त २ धावा केल्या. जॉर्जिया वॅरेहमने २५ चेंडूत २२ धावा केल्या. दिल्लीच्या राधा यादवने जॉर्जीयाला क्लीन बोल्ड केलं. तसंच गुजरातची कर्णधार स्नेह राणा शिखा पांडेच्या गोलंदाजीवर बाद झाली.

या महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स पहिल्यांदाच आमनेसामने उतरले आहेत. दिल्लीने यापू्र्वी झालेल्या तीन सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण गुजरातला तीन सामन्यांमध्ये फक्त एकाच सामन्यात विजय संपादन करता आलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत वरचा टप्पा गाठण्यासाठी गुजरातच्या संघाला सामना जिंकण्याची गरज आहे. दिल्लीचा मागील सामन्यात मुंबई इंडियन्सने पराभव केला होता. त्यामुळे दिल्ली ४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.