GT Retention and Release List IPL 2026: प्रत्येक लिलावापूर्वी अतिशय चोख अभ्यास करून उतरणाऱ्या गुजरात टायटन्सने तूर्तास तरी केवळ एकमेव खेळाडू ट्रेड केला आहे. गुजरातने धडाकेबाज फलंदाज शेरफन रुदरफोर्डला रिलीज केलं आहे. रुदरफोर्ड आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.

गुजरातच्या नेतृत्वाची धुरा शुबमन गिलकडे आहे. त्यांच्या ताफ्यात जोस बटलर आणि साई सुदर्शन आहेत. पण या तिघांनंतर मधल्या फळीची अडचण आहे. पहिल्या काही हंगामात डेव्हिड मिलर त्यांचा आधारस्तंभ होता. त्याला परत मिळवण्यासाठी गुजरात प्रयत्नशील आहे.

रशीद खान हा त्यांचा मुख्य फिरकीपटू आहे. कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अर्शद खान, साई किशोर यामुळे त्यांची गोलंदाजी सक्षम आहे. शाहरुख खानकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत मात्र त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

गुजरात टायटन्सने रिटेन केलेले खेळाडू
शुबमन गिल, साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल टेवाटिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर सिंग ब्रार, रशीद खान, मानव सुतार, साईकिशोर, जयंत यादव

रिलीज केलेले खेळाडू
शेरफन रुदरफोर्ड (ट्रेडआऊट), महिपाल लोमरुर, करीम जनत, दासून शनका, गेराल्ड कुत्सिया, कुलवंत खेजरोलिया