Gus Atkinson Fifer IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज गस एटकिन्सनने पाच विकेट्स घेत भारताचा डाव आटोपला. भारताने ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ बाद २०४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच ६ षटकांत संपूर्ण भारतीय संघ २२४ धावा करत सर्वबाद झाला. यामध्ये गस एटकिन्सनने मोठी भूमिका बजावली. एकट्या एटकिन्सनने भारताचा निम्मा संघ माघारी धाडला.
गस एटकिन्सन दुखापतीमुळे गेला बराच काळ इंग्लंडच्या कसोटी संघाबाहेर होता. भारतविरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पुनरागमनाच्या या सामन्यातच गस एटकिन्सनने पाच विकेट्स घेत भारतीय संघाचा डाव आटोपला.
६ धावांत भारताने ४ विकेट्स गमावत भारत ऑलआऊट
भारतीय संघ दुसऱ्या दिवशी सामना सुरू होताच अवघ्या अर्ध्या तासात सर्वबाद झाला. टीम इंडियाने २०४ धावांच्या पुढे खेळायला सुरूवात केली. पहिल्याच षटकात २ चौकार लगावत सुरूवात केली. यानंतर जोश टंगने करूण नायरला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर एटकिन्सनने २ षटकांत ३ विकेट्स घेत संघाचा डाव आटोपला.
एटकिन्सनचे ५ विकेट्स आणि गिलला रॉकेट थ्रोवर केलेलं धावबाद
एटकिन्सनने कमालीच्या लाईन आणि लेंग्थसह गोलंदाजी करत विकेट्स घेण्यात माहिर आहे. त्याने सामन्याच्या सुरूवातीलाच यशस्वी जैस्वालला पायचीत करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली होती. यानंतर त्याच्या गोलंदाजीवर शुबमन गिलला त्याने धावबाद केलं होतं. चुकीच्या कॉलवर धाव घेण्याची गिलने केली आणि एटकिन्सनने रॉकेट थ्रो मारत त्याला धावबाद केलं.
यानंतर त्याने रिव्ह्यूमुळे वाचलेल्या ध्रुव जुरेलला हॅरी ब्रुककरवी झेलबाद केलं. दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरला झेलबाद करत तिसरी विकेट मिळवली. यानंतर त्याने पुढच्या षटकात दोन विकेटस घेतले. मोहम्मद सिराजला कमालीच्या भेदक चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. तर प्रसिध कृष्णा खात न उघडताच झेलबाद झाला.