भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याची नुकतीच IPL मधील पंजाब संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. अनेक बदल करूनही पंजाबला गेल्या दोन वर्षात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे कुंबळेची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गेले काही दिवस कुंबळे चर्चेत आहे, पण आज मात्र कुंबळे चर्चेत असण्याचे कारण म्हणजे कुंबळेचा वाढदिवस.

भारताच्या ‘जम्बो’चा वाढदिवस असल्यामुळे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यात कायम हटके ट्विट करणारा विरेंद्र याचे आजचे ट्विटदेखील सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले. भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक उत्तम मॅच विनर आणि अनेकांचा आदर्श असलेल्या अनिल कुंबळेला शुभेच्छा असे त्याने ट्विट केले. याचसोबत ज्यावेळी कुंबळेकडे क्रिकेट कारकिर्दीत दुसरे शतक झळकण्याची संधी होती, तेव्हा सेहवागने दिलेल्या सल्ल्यामुळे कुंबळेचे शतक हुकले होते. त्यासाठी सेहवागने आजही त्याची माफी मागितली.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत २००७- ०८ मध्ये नवव्या स्थानी कुंबळे फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत इशांत शर्मा खेळत होता. या सामन्यात चहापानादरम्यान कुंबळे ८७ धावांवर खेळत होता. दरम्यान, चहापानाच्या वेळेला मैदानाबाहेर गेलेल्या कुंबळेला सेहवागने मोठे फटके खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मैदानावर फलंदाजीसाठी जाताच पहिल्याच चेंडुवर कुंबळे बाद झाला. त्यामुळे १३ धावांनी त्याचे शतक हुकले. यासाठी आजही सेहवागने कुंबळेची माफी मागितली.

दरम्यान, ‘कुंबळे, तु तुझ्या आयुष्याचे शतकदेखील पूर्ण कर’, असे म्हणत सेहवागने कुंबळेला शुभेच्छा दिल्या. याशिवाय इतरही क्रिकेटपटूंनी कुंबळेला शुभेच्छा दिल्या.

माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर याने कुंबळेला शुभेच्छा दिल्या

हरभजनने कुंबळेला गुरू आणि गोलंदाजीतील भागीदार म्हणून शुभेच्छा दिल्या.

व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही कुंबळेला शुभेच्छा दिल्या.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघानेही आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, कुंबळेला पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यामुळे IPL 2020 मधील पंजाबच्या कामगिरीवर क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष राहणार आहे.