Harbhajan Singh vs S Sreesanth: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये सुरूवात झाली होती. सर्वकाही नवीन होतं. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंना एकाच संघातून खेळण्याची संधी मिळाली होती. दरम्यान पहिल्याच हंगामात मोठा वाद रंगला होता. किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीसंथच्या कानाखाली मारली होती. हा वाद चांगलाच चर्चेत राहिला होता. आयपीएल स्पर्धेचे १८ हंगाम पूर्ण होऊनही या वादाची चर्चा आजही रंगते. पण नेमकं काय घडलं होतं, हे कोणालाच माहित नाही. दरम्यान आता १८ वर्षांनंतर या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ललित मोदीने शेअर केला व्हिडीओ
आयपीएलच्या पहिल्याच हंगामाला या वादामुळे गालबोट लागलं होतं. मात्र, नेमकं काय घडलं होतं, याचा व्हिडीओ समोर आला नव्हता. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पर्धेतील पहिल्या हंगामात हरभजन सिंग मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत होता. तर एस श्रीसंथ पंजाबचं प्रतिनिधित्व करत होता. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि रागात हरभजनने श्रीसंथच्या कानाखाली मारली होती. पण या घटनेचा व्हिडीओ समोर आला नव्हता. हरभजन सिंग संताप व्यक्त करताना दिसून आला होता. तर श्रीसंथ आपले अश्रू पुसताना दिसून आला होता. आता आयपीएल स्पर्धेची सुरूवात करणाऱ्या ललित मोदी यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
ललित मोदी गेल्या काही वर्षांपासून परदेशात आहे. मात्र, भारतात ते नेहमीच चर्चेत असतात. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत एक पॉडकास्ट केला आहे. या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याच पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी हरभजन- श्रीसंथ वादाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या पॉडकास्टमध्ये बोलताना हरभजन सिंगने सांगितलं की, सामना समाप्त झाला होता. मैदानावरील सर्व कॅमेरे बंद होते. पण ललित यादव यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला कॅमेरा सुरू होता. मैदानावर सामन्यानंतर जे झालं ते ललित मोदिंच्या कॅमेऱ्यात सर्व काही शूट झालं. हा व्हिडीओ कुठेही अपलोड करण्यात आला नव्हता. आता १८ वर्ष उलटून गेल्यानंतर ललित मोदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला. त्यादिवशी मैदानात नेमकं काय घडलं होतं, हे या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे.