टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत संबंधाबाबत मोठा खुसाला केला आहे. महेंद्रसिंह धोनी हा त्याच्या भावासारखा आहे आणि प्रत्येक कठीण प्रसंगी तो त्याची आठवण करतो. पंड्याच्या मते, धोनी एकमेव व्यक्ती आहे जो त्याच्या भावना समजून घेतो. पंड्या असेही म्हणाला की फक्त माही त्याला शांत करू शकतो. २०१६ मध्ये हार्दिकने धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीच्या विश्वासामुळे पंड्याला एक चांगला अष्टपैलू म्हणून ओळखले गेले.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना हार्दिक पंड्याने जानेवारी २०१९ ची एक घटना सांगितली, जेव्हा एका टीव्ही शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्याला आणि केएल राहुलला निलंबित करण्यात आले होते. तपासानंतर त्याच्यावरील लादलेली बंदी उठवण्यात आली. यानंतर पंड्याला न्यूझीलंड दौऱ्यावर पाठवण्यात आले. हार्दिकच्या मते, धोनीने या कठीण काळात त्याला मदत केली होती.

हार्दिक म्हणाला, “धोनी अशी व्यक्ती आहे जी मला सुरुवातीपासूनच समजते. मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे? कोणत्या गोष्टी मला आवडत नाहीत. जानेवारी २०१९ मध्ये बंदी उठवल्यानंतर जेव्हा मला न्यूझीलंडला पाठवण्यात आले तेव्हा सुरुवातीला माझ्यासाठी हॉटेलमध्ये जागा नव्हती. नंतर मला फोन आला की धोनीने माझ्यासाठी खोलीची व्यवस्था केली आहे. धोनी म्हणाला होता की तो बेडवर झोपत नाही. तो खाली झोपेल आणि मी त्याच्या  बेडवर असेल. तो अशी व्यक्ती आहे जो नेहमी मला मदत करण्यास तयार असतो.”

माही माझ्या भावासारखा 

हार्दिक पंड्या म्हणाला, “धोनी मला खूप खोलवर समजून घेतो. मी त्याच्या खूप जवळ आहे. तो एकमेव व्यक्ती आहे जो मला शांत करू शकतो. जेव्हा माझ्याशी खूप वाद झाला होता तेव्हा त्याला वाटले की मला मदतीची गरज आहे. यानंतर, त्याने मला माझ्या कारकीर्दीत अनेक वेळा मदत केली. माही माझ्यासाठी माझ्या भावासारखा आहे. मी त्याचा आदर करतो कारण जेव्हा मला गरज होती तेव्हा त्याने मला मदत केली.”

धोनी आणि माझे नाते एकदम घट्ट

“धोनी आणि माझे नाते एकदम घट्ट आहे. माही भाई डार्लिंग सारखा आहे. मी त्याच्याबरोबर अनेक गोष्टी करू शकतो जे इतर कोणी करू शकत नाही. मी त्याच्यासोबत एमएस धोनी सारखा वागत नाही. त्याला माझे शब्द चांगले समजतात. मी काही करत असेल तर ते विचारपुर्वक करतो, हे धोनीला माहित आहे”, असे हार्दिक पंड्या म्हणाला. 

धोनी माझा लाईफ कोच 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक पंड्या म्हणाला धोनी माझा लाईफ कोच आहे. त्यांच्यातील संभाषण देखील चांगले आहे. तसेच पंड्या नेहमी धोनीचा सल्ला घेतो. साहजिकच धोनी सोबत राहून तुम्ही प्रौढ व्हायला शिकाल, तुम्ही नम्र व्हायला शिकाल. त्याला बघून मी खूप काही शिकलो. तो कधीही आपला स्वभाव बदलत नाही, असे पंड्या धोनीबाबत म्हटला आहे.