Video : ओळखा कुणाकडून शिकलो मी हा फटका? हार्दिकचं चॅलेन्ज

IPL 2019 ही स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेला केवळ काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे आता IPL फिव्हर जोर धरू लागला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट प्रसिद्ध आहे. धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडल्याचे तुम्ही पाहिले आहे. याच हेलिकॉप्टर शॉटचे आता अन्य आंतरराष्ट्रीय फलंदाजही अनुकरण करताना दिसतात. राशिद खान, मॅक्सवेल, इशान किशन आणि आता यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकचेही नाव जोडले गेले आहे. होय… हार्दिक पांड्या धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचे धडे घेतोय.

IPL 2019 ही स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेला केवळ काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे आता IPL फिव्हर जोर धरू लागला आहे. त्यापूर्वी प्रत्येकजण सरावाला लागाल आहे. हार्दिक पांड्याही दुखापतीतून सावरून सरावाला लागला आहे. याचा एक व्हिडीओ त्याने ट्विट केला आहे. त्यामध्ये तो धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचे अनुकरण कराताना दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये चाहत्यांना प्रश्नही विचाराला आहे. या शॉटमागील प्रेरणा कोण आहे तुम्हाला माहित आहे का? यावर चाहत्यांनी आपली मतेही व्यक्त केली आहेत…

हार्दिकच्या या पोस्टवर काही नेटीझन्सनी धोनीकडून तू ट्रेनिंग घ्यायला हवे असा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याला करण जोहरवरून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. एकदंरीत नेटीझन्सनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hardik pandya try helicopter shot on net

ताज्या बातम्या