Moeen Ali’s groin injury in ENG vs AUS 5th Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या अडचणी वाढल्या आहेत. स्टार अष्टपैलू मोईन अली पहिल्या दिवसाच्या फलंदाजीदरम्यान कंबरेच्या दुखापतीमुळे अडचणीत सापडला आहे. दुखापत झाल्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नाही. सध्या तो इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हॅरी ब्रूकने मोईन अलीच्या फिटनेसचे दिली अपडेट –

पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, हॅरी ब्रूकने बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलमधून मोईन अलीच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, ‘अली सध्या चांगल्या स्थितीत आहे, दुसऱ्या दिवशी तो मैदानात उतरू शकेल अशी अपेक्षा आहे. आमच्यासाठी काही षटके टाकू शकतो आणि पुढच्या डावात धावाही करू शकतो.’

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

आशा आहे अली लवकर बरा होईल –

हॅरी ब्रूकने मोईन अलीचे कौतुक केले. त्याने सांगितले की, ‘अली आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने कदाचित त्याला हवे तसे प्रदर्शन केले नाही, तो खूप चांगला खेळाडू आहे आणि या मालिकेत तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अव्वल खेळाडू आहे. तो लवकर बरा होईल अशी आशा आहे.’

हेही वाचा – IND vs WI: रवींद्र जडेजाने कपिल देव यांना मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या –

दुखापत झाल्यानंतरही फलंदाजी करताना मोईन अलीला वेदना होत होत्या. त्याला धावताही येत नव्हते. त्यामुळे त्याने मोठे फटके खेळले आणि ३४ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव लवकरच संपुष्टात आला. इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या आहेत. अली बाद झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या ३ बाद १८४ अशी होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने १ गडी गमावून ६१ धावा केल्या आहेत.