क्रमक खेळामुळे रंगतदार झालेल्या लढतीत दिल्ली व्हेवरायडर्सने रांची ऱ्हिनोस संघाला ५-२ असे सहज नमवत हॉकी इंडिया लीग स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखले. दिल्ली संघाकडून गुरविंदरसिंग चंडी (तिसऱ्या आणि २०व्या मिनिटाला), सिमोन चाइल्ड (सातव्या मिनिटाला), रुपिंदरपाल सिंग (४० व्या मिनिटाला) व गुरबाज सिंग (४९व्या मिनिटाला) यांनी गोल केले. रांचीकडून निकोलस विल्सन (२३व्या मिनिटाला) व मनप्रीत सिंग (६९व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. दिल्लीने सात सामने जिंकून ३९ गुणांची कमाई केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2013 रोजी प्रकाशित
हॉकी इंडिया लीग ? दिल्लीचा रांचीवर विजय
क्रमक खेळामुळे रंगतदार झालेल्या लढतीत दिल्ली व्हेवरायडर्सने रांची ऱ्हिनोस संघाला ५-२ असे सहज नमवत हॉकी इंडिया लीग स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखले.
First published on: 02-02-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hil delhi beat ranchi