सध्या दुखापतीमुळे मी पूर्णपणे तंदुरुस्त नसलो तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याची माझी संधी गेलेली नाही. लवकरच मी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवीन, असा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय बॉक्सर सुरंजॉयसिंग याने येथे व्यक्त केला.
आगामी जागतिक स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत सुंरजॉय हा पहिल्याच फेरीत बाद झाला. दुखापतीमधून तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. सुरंजॉयसिंग याने २००९ ते २०१० या कालावधीत सात आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले आहे. सुरंजॉय याच्या आईचे २०१० मध्ये निधन झाल्यानंतर त्याला लागोपाठ आजारपण व दु:खद प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे. २०१२ मध्ये जागतिक सेनादल स्पर्धेत त्याला कांस्यपदक मिळाले. या पदकाचा अपवाद वगळता सुरंजॉय याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदकापासून वंचित राहावे लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2013 रोजी प्रकाशित
आंतरराष्ट्रीय पदक मिळवीन-सुरंजॉय
सध्या दुखापतीमुळे मी पूर्णपणे तंदुरुस्त नसलो तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याची माझी संधी गेलेली नाही.
First published on: 30-08-2013 at 05:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hope to win international medal suranjoy singh