रोहित शर्मानंतर शुबमन गिलच्या खांद्यावर भारताच्या कसोटी संघाची जबाबदारी देण्यात आली. गिलने ही जबाबदारी चांगली पार पाडत पहिलीच कसोटी मालिका बरोबरीत ठेवण्यात मोठी भूमिका बजावली. आता कसोटीनंतर टी-२० आणि वनडेमध्ये देखील भविष्यात गिल संघाचं कर्णधारपद भूषवणार असल्याचं दिसत आहे. यादरम्यान प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ ग्रीनस्टोन लोबो यांनी त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठं भाकित केलं आहे.
प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी शुबमन गिलच्या खेळाडू आणि कर्णधार म्हणून भवितव्याबाबत धाडसी भाकीत केलं आहे. त्यांच्या मते, गिलचा “अत्यंत प्रभावी कुंडली योग” असल्यामुळे तो भारतासाठी धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज ठरेल. मात्र, कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीबाबत पाहा नेमकं काय म्हणाले.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत लोबो म्हणाले, “शुबमन गिल हा सध्या भारतीय क्रिकेटमधला उदयोन्मुख स्टार खेळाडू आहे. त्याचा जन्म १९९७ किंवा १९९९ मधील असावा, नेमकी तारीख निश्चित नाही. त्यामुळे इंटरनेटवर जे काही लिहिलं आहे ते पूर्ण खरं असेलच असं नाही. पण तो कोणत्याही वर्षी जन्मला असला तरी त्याची कुंडली अतिशय विलक्षण आहे. त्याचे सर्व ग्रह-लघुग्रह (Asteroids) प्रचंड ताकदीचे आहेत. विशेष म्हणजे त्याच्या कुंडलीत प्लूटो ‘ग्रे लिझर्ड’ आहे. या अवस्थेतील प्लूटो म्हणजे असा व्यक्ती, जो कितीही मोठ्या अडचणी आणि संकटांना सामोरं गेला तरी त्यावर मात करून विजयी होतो,” असं लोबो पुढे म्हणाले.
“याचा प्रत्यय आपण इंग्लंडविरूद्ध मालिकेत आधीच घेतला आहे. मालिकेत २-१ अशी आघाडी होती, कसोटी मालिकेचं भवितव्य पणाला लागलं होतं आणि शुबमन गिलच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे संघाने गती पकडली. नक्कीच इतर अनेक घटक महत्त्वाचे होते, पण शुबमनच्या नेतृत्वाची भूमिका ठळक होती. ही गोष्ट खूप कमालीची होती. आता प्रश्न असा येतो की, त्याला कर्णधार करण्याचा निवड समितीचा निर्णय योग्य होता का? याचं उत्तर स्पष्ट आहे. होय, तो निर्णय अगदी बरोबर ठरला.”Shubman Gill: मोठी भविष्यवाणी! “गंभीर-आगरकरमुळे भारताच्या वर्ल्डकप विजयाच्या शक्यता धोक्यात”, गिल नेतृत्त्वासाठी तयार नाही!
शुबमन गिलला वनडेचे कर्णधारपद देण्याबाबत लोबोचं मोठं भाकित
“खेळामध्ये आणि तेही सर्वोच्च स्तरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करायचं असेल, तर त्यासाठी विलक्षण कुंडली असावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर महेंद्रसिंग धोनी किंवा रोहित शर्मा. या दोघांच्याही पत्रिकेत सर्वात बलवान ग्रह सातव्या घरात होता. सातवं घर म्हणजे शत्रूंवर विजय मिळवणे. आता प्रश्न असा आहे की शुबमन गिलच्या पत्रिकेत हा ग्रहयोग आहे का? त्याची नेमकी जन्मतारीख आपल्याला माहित नाही… पण एवढं नक्की की तो आधीच कर्णधार झाला आहे आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून समोर आला आहे, असं लोबो म्हणाले.”
शुबमन गिलला वनडे कर्णधारपद देण्याचा योग्य काळ कोणता? लोबो म्हणाले…
“महत्त्वाचं म्हणजे, सध्याच्या घडीला ग्रहस्थिती प्रामुख्याने १९९० च्या मध्य काळात जन्मलेल्या व्यक्तींसाठी जास्त अनुकूल आहे. शुबमन गिलचा जन्म मात्र १९९० च्या उत्तरार्धात झाला आहे. या काळात जन्मलेले कर्णधार मोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावतील. त्यामुळे जर तो आता एकदिवसीय संघाचा कर्णधार झाला, तर माझ्या मते ते भारतासाठी योग्य ठरणार नाही. मी दीर्घकालीन भविष्याबद्दल बोलत नाही. पण २०३१चा विश्वचषक हा शुबमन गिलसाठी मोठं विजेतेपद जिंकण्यासाठी अधिक योग्य काळ ठरू शकतो.”
ज्योतिष लोबोने भारताच्या निवड समितीली केलं आवाहन
“कोणी निवडकर्ता कोणीही अजित आगरकर, गौतम गंभीर कोणी ऐकत असेल तर कृपया त्याला वनडेचं कर्णधारपद देण्याची घाई करू नका. तुम्ही भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या संधी स्वतःहून मारून टाकत आहात. ही मोठी गोष्ट असणार आहे आणि आपल्याला योग्य कर्णधार हवा आहे. योग्य कर्णधार कोण? तर १९९३ ते १९९४ दरम्यान जन्मलेला खेळाडू. अगदी १९९२ मध्ये जन्मलेला खेळाडूसुद्धा चालेल. त्या काळात जन्मलेला एखादा चांगला खेळाडूच भारताचा एकदिवसीय कर्णधार व्हायला हवा.” ज्योतिषतज्ञ ग्रीनस्टोन लोबो यांनी केलेली भविष्यवाणी पाहता आता टीम इंडियाचं व्यवस्थापन काय निर्णय घेणार, यावर सर्वांच्या नजरा असतील.