भारताची वेगवान धावपटू द्युती चंदने तिला तिची योग्य जोडीदार मिळाली असल्याचे म्हटले आहे. द्युतीने तिच्याच शहरातील एका मुलीला जिला ती काही वर्षांपासून ओळखते आपली जोडीदार असल्याचे म्हटले आहे . १०० मीटर शर्यतीत विक्रम नोंदवणारी व २०१८ मधील आशियाई स्पर्धेत दोन रौप्य पदक मिळवणारी द्युती आपले समलैगिंक संबंध असल्याचे सांगणारी पहिली भारतीय क्रीडापटू ठरली आहे. मात्र, द्युतीने आपल्या जोडीदाराची ओळख लपवली आहे. कारण, तिच्यावर अयोग्यरित्या लक्ष केंद्रीत केले जाऊ नये अशी तिची इच्छा आहे.

द्युती सध्या जागतिक विजेतेपदासाठी व पुढील वर्षी टोकीओत होऊ घातलेल्या ऑलंम्पिक स्पर्धेसाठी कठोर मेहनत घेत आहे. त्यामुळे आपल्या नातेसंबंधांबाबतच्या काही औपचारिकता तिने पुढे ढकलल्या आहेत.

मला कुणीतरी अस मिळाल आहे, जे माझ योग्य जोडीदार आहे. माझा विश्वास आहे की प्रत्येकाने जे काही ठरवले असेल त्याच्याबरोबर राहण्याचे त्याला पुर्ण स्वातंत्र्य आहे. मी समलैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींच्या हक्कांचे नेहमीच समर्थन केले आहे. तो त्यांचा वैयक्तिक व्यक्ती निवडीचा भाग आहे. सध्या मी जागतिक विजेतेपदावर आणि ऑलंम्पिक स्पर्धेवर लक्ष्य केंद्रीत केलेले आहे. मात्र, भविष्यात मला तिच्याबरोबर राहयला आवडेल, असे द्युतीने द संडे एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ बाबत मागिलवर्षी दिलेल्या ऐतिहासीक निर्णयानंतर, आपण ‘एलजीबीटी’ समुदायाच्या हक्कांसह स्वतःच्या समलैगिंक संबंधाबाबत बोलण्याचे धाडस एकवटवले होते, असेही द्युतीने सांगितले.  तसेच, माझा नेहमी यावर विश्वास राहिला आहे की, प्रत्येकाल प्रेम करण्याचा अधिकार आहे. प्रेमाच्या भावनेपेक्षा कुठलीही मोठी भावना नाही आणि हे नाकारले जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने देखील यासाठी जुना कायदा नष्ट केला. मला असे वाटते की, एक अॅथलेट्स म्हणून मी कुणाबरोबर राहावे हे ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. मला हव्या असलेल्या व्यक्तीबरोबर राहणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्याचा सन्मान व्हायला हवा. आंतरराष्ट्रीय पातळीवर मी भारतासाठी पदक जिंकणे सुरूच ठेवेल, असेही द्युतीने सांगितले.