‘‘भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या निवडणुकीत प्रत्येक राज्याचे दोन प्रतिनिधी पाठवले जातात. त्या प्रतिनिधींची यादी महासंघाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये कुठल्याही राज्यातून प्रतिनिधी म्हणून माझे नाव नाही,’’ असे मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह विश्वास मोरे यांनी स्पष्ट केले.
दोन जिल्ह्य़ांचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल मिनानाथ धानजी यांच्यावर बंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाविरोधात बोलताना धानजी यांनी विश्वास मोरेही दोन पदांवर कार्यरत असल्याचे म्हटले होते.
विश्वास मोरे यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त पदासाठी मुंबईकडून उमदेवारी अर्ज भरला होता, या निवडणुकीत ते पराभूत झाले. यानंतर कबड्डी महासंघाच्या निवडणुकीत ते गोवा राज्याचे प्रतिनिधी आहेत असा उल्लेख करण्यात आला होता, असा धानजी यांनी केलेला दावा मोरे यांनी खोडून काढला. धानजी महासंघाच्या तांत्रिक समितीवर होते, तेव्हा ते कुठल्या राज्याचे प्रतिनिधी होते, असा सवालही मोरे यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2013 रोजी प्रकाशित
मी अन्य कुठल्याही राज्याचा प्रतिनिधी नाही -विश्वास मोरे
‘‘भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या निवडणुकीत प्रत्येक राज्याचे दोन प्रतिनिधी पाठवले जातात. त्या प्रतिनिधींची यादी महासंघाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
First published on: 01-08-2013 at 05:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not representative of any other state vishwas more