Prithvi Shaw On Cheteshwar Pujara : आपल्या करिअरची अप्रतिम सुरुवात केल्यानंतर पृथ्वी शॉ आता भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत खूप मागे राहिला आहे. परंतु, मुंबईच्या या युवा खेळाडूने मोठं विधान केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शॉ म्हणाला की, राष्ट्रीय संघात पुन्हा एकदा जागा पक्की करण्यासाठी चांगली कामगिरी करण्याकडे लक्ष केंद्रीत करेल. शॉने भारतासाठी जुलै २०२१ मध्ये कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालं नाहीय. शॉने मध्य क्षेत्र आणि पश्चिम क्षेत्र यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुलीप ट्रॉफीच्या सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली.

शॉने माध्यमांशी बोलताना म्हटलं, “मला माझ्या खेळात बदल करण्याची आवश्यकता आहे, असं व्यक्तीगतरित्या मला वाटतं नाही. मी माझा खेळ समजून घेऊन त्यात बदल करु शकतो. मी चेतेश्वर पुजारा सरांसारखी फलंदाजी करु शकत नाही किंवा ते माझ्यासारखी फलंदाजी करु शकत नाही. मी त्याच गोष्टी करायचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे.

नक्की वाचा – MS Dhoni Birthday: महेंद्रसिंग धोनीकडे किती संपत्ती आहे? IPL मध्ये कमावले ‘इतके’ कोटी रुपये

मी माझ्या आक्रमक फलंदाजीत बदल करू शकत नाही. माझ्या करिअरच्या या टप्प्यात मला जास्तीत जास्त सामने खेळायचे आहेत. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रत्येक धाव माझ्यासाठी महत्वाची आहे. मला यावेळी ज्या सामन्यात खेळण्याची संधी मिळत आहे, ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. दुलीप ट्रॉफीसाठी किंवा मुंबईसाठी सामने खेळू, मला वाटतं की अप्रतिम कामगिरी करणं माझ्यासाठी महत्वाचं ठरेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये दोन्ही इनिंगमध्ये शॉला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने २५ आणि २६ धावांची खेळी केली. यावर बोलताना शॉ म्हणाला. इथे फलंदाजी करण्यासाठी परिस्थिती आव्हानात्मक होती. तुम्ही प्रत्येक वेळी यशस्वी होत नाही. धावा करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. टी-२० मध्ये थोडी आक्रमक फलंदाजी करावी लागते.