खेळताना आक्रमक वृत्ती विराट कोहलीसारखी असली पाहिजे व मला त्याच्यासारखा वेगवान खेळ करायला मला आवडेल, असे ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायनाने सिडनी येथे रविवारी झालेल्या अंतिम लढतीत चीनच्या सून यू हिच्यावर मात केली होती. या स्पर्धेत तिचे हे पहिलेच विजेतेपद आहे. आगामी रिओ ऑलिम्पिकपूर्वी तिचे हे विजेतेपद आत्मविश्वास उंचावणारे आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच विराट कोहलीनेही कौतुक केले आहे. कोहलीने ट्विटरवर म्हटले आहे, ‘‘तुझी ही कामगिरी प्रत्येक भारतीय नागरिकास अभिमानास्पद वाटणारी आहे. असेच उत्तरोत्तर यशाचे शिखर गाठत राहा!’’

कोहलीच्या संदेशाबाबत सायनाने म्हटले आहे, ‘‘मला तुझ्यासारखे आत्मविश्वासाने फटकेबाजी करायला आवडेल. तुझ्या या शुभेच्छा मला ऑलिम्पिकसाठी प्रेरणादायकच आहेत!’’

सायनाने २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I would love to get more aggression like you saina nehwal to virat kohli
First published on: 14-06-2016 at 05:26 IST