भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावरती झाला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा दोन गडी राखून पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, या विजयानंतर भारताच्या आनंदावर पाणी फिरलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय संघाला स्लो ओव्हर रेटसाठी (Slow Over Rate) दंड ठोठावला आहे.

हेही वाचा- जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : अन्नू राणी सातव्या स्थानी

सामना शुल्काच्या २० टक्के दंड

याबाबत आयसीसीकडून एक पत्रही जारी करण्यात आलं आहे. आयसीसी आचारसंहितेच्या नियम २.२२ नुसार, कोणताही संघ किंवा खेळाडू स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला, तर त्याची मॅच फी २० टक्क्यांनी कमी करण्यात येईल. या आरोपानंतर कर्णधार शिखर धवनने आपली चूक मान्य केली आहे त्यामुळे आता यावर पुढील सुनावणीची गरज नसल्याचे आयसीआयसीआयने म्हणले आहे. भारतीय संघावर सामना शुल्काच्या २० टक्के दंड लावण्यात आला आहे.

तीन धावांनी विंडीजचा पराभव

या सामन्यात कर्णधार शिखर धवनचे शतक केवळ तीन धावांनी हुकले. त्याने १० चौकार आणि तीन षटकार मारत ९९ चेंडूत ९७ धावा काढल्या होत्या. तसेच शुभमन गिलच्या ६४ धावा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या खेळीनंतर भारताने ५० षटकांमध्ये ३०८ धावा काढल्या होत्या. मात्र, वेस्ट इंडिजला ५० षटकांमध्ये ३०५ धावा काढण्यात आल्या आणि ३ धावांनी विंडीज पराभवाचा सामना करावा लागला.