ICC has announced the list of ICC TV commentators: आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ भारतात सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सर्व चाहतेही आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्याच वेळी, आयसीसीने काही समालोचकांची नाव जाहीर केली आहेत, जी आयसीसी टीव्हीच्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ कव्हरेजला आपला आवाज देतील.

विश्वचषकात हे दिग्गज आपल्या आवाजाने चाहत्यांना करणारा मंत्रमुग्ध –

आयसीसी टीव्हीच्या कार्यक्रमाच्या कव्हरेजमध्ये सामनापूर्व शो, एक डाव मध्यांतराचा कार्यक्रम आणि सामन्यानंतरचा रॅप-अप समाविष्ट असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन या कव्हरेजमध्ये सामील होतील. त्यांना शेन वॉटसन, लिसा स्थळेकर, रमीझ राजा, रवी शास्त्री, अॅरॉन फिंच, सुनील गावसकर आणि मॅथ्यू हेडन यांसारख्या खेळाडूंची साथ मिळेल.

Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
IPL 2024 KKR vs RR and GT vs DC Games rescheduled
IPL 2024: आयपीएलच्या वेळापत्रकात दोन बदल, कोणत्या सामन्यांच्या तारखेत अदलाबदली; जाणून घ्या

कॉमेंट्री बॉक्समध्ये नासेर हुसेन, इयान स्मिथ आणि इयान बिशप यांचे पुनरागमन होईल, ज्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील २०१९ च्या विश्वचषक फायनलला संस्मरणीय बनवले होते. वकार युनूस, शॉन पोलॉक, अंजुम चोप्रा आणि मायकेल अथर्टन यांच्यासह आणखी आंतरराष्ट्रीय आयकॉन आणि माजी कर्णधार देखील कॉमेंट्री बॉक्समधून लाइव्ह अॅक्शनमध्ये असणार आहेत.

हेही वाचा – Criiio 4 Good: आता मुली क्रिकेटमधून शिकणार जीवनकौशल्य; शिक्षण मंत्रालय, आयससीसह युनिसेफने घेतला पुढाकार

सायमन डौल, मम्पुमेलो एमबांगवा, संजय मांजरेकर, केटी मार्टिन, दिनेश कार्तिक, डर्क नॅन्स, सॅम्युअल बद्री, अथर अली खान आणि रसेल अर्नोल्ड हे दिग्गज खेळाडूही या आनंदात सामील होणार आहेत. तसेच या पॅनलमध्ये जगातील काही दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये हर्षा भोगले, कास नायडू, मार्क निकोलस, नताली जर्मनोस, मार्क हॉवर्ड आणि इयान वार्ड यांच्या नावांचा समावेश आहे.

५ ऑक्टोबरपासून स्पर्धेला होणार सुरुवात –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना गतविजेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच याच मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामन्याने स्पर्धेचा समारोप होईल.

हेही वाचा – Asian Games: किरण बालियानने सहाव्या दिवशी पटकावले आठवे पदक; निखत झरीन उपांत्य फेरीत दाखल, स्क्वॉशमध्येही पदक निश्चित

तत्पूर्वी या स्पर्धेच्या सराव सामन्याला २९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत १० संघ सहभागी झाले आहेत. यातील प्रत्येक संघाला विश्वचषकापूर्वी दोन सराव सामने खेळायला मिळणार आहेत. हे सराव सामने ३ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून हैदराबाद, तिरुअंनतपुरम आणि गुवाहाटी येथे खेळले जाणार आहेत.