टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकमध्ये लढत होणार का?

यंदा स्पर्धेत १२ संघांचा सहभाग असेल.

ऑस्ट्रेलियामध्ये २०२०मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विश्वचषकांमध्ये १२ संघाचा सहभाग असणार आहे. टी-२० क्रमवारीतील अव्वल आठ संघाना सरळ प्रवेश देण्यात आला आहे. इतर चार संघ पात्रता फेरी खेळून येतील. यामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियात रंगणारी ही टी-२० स्पर्धा २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पार पडणार आहे. सुपर१२ साठी पात्र ठरलेल्या संघाची नावं आयसीसीने यापूर्वीच जाहीर केली आहेत. यामध्ये पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघाचा समावेस आहे. भारत आणि पाकिस्तान संघाना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघामध्ये सामना रंगणार नाही. मात्र, उपांत्य अथवा अंतिम सामन्यात सामना रंगतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

असं आहे वेळापत्रक –
ऑक्टोबर २४- ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर २४- भारत vs दक्षिण आफ्रिका (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २५- न्यूझीलंड vs वेस्टइंडिज (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर २५- क्वालिफायर १ vs क्वालिफायर २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर २६- अफगाणिस्तान vs क्वालिफायर ए २ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २७- इंग्लंड vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २७- न्यूझीलंड vs क्वालिफायर बी २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर २८- अफगाणिस्तान vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २८- ऑस्ट्रेलिया vs वेस्टइंडीज (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर २९- भारत vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर २९- पाकिस्तान vs क्वालिफायर ए १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर ३०- इंग्लंड vs दक्षिण अफ्रिका (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर ३०- वेस्टइंडीज vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर ३१- पाकिस्तान vs न्यूजीलंड (गाबा)
ऑक्टोबर ३१- ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर १- भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर १- दक्षिण अफ्रिका vs अफगानिस्तान (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर २- क्वालिफायर ए १ vs क्वालिफायर बी 1 (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर २- न्यूजीलंड vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर ३- पाकिस्तान vs वेस्टइंडीज (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ३- ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर बी २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ४- इंग्लंड vs अफगाणिस्तान (गाबा)
नोव्हेंबर ५- दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ५- भारत vs क्वालिफायर बी १ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ६- पाकिस्तान vs क्वालिफायर बी २ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ६- ऑस्ट्रेलिया vs न्यूजीलंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ७- वेस्टइंडीज vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ७- इंग्लंड vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर ८- दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर बी १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ८- भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ११ – पहिला उपांत्य सामना (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर १२ – दुसरा उपांत्य सामना (एडिलेड ओव्हल)

नोव्हेंबर १५ – अंतिम सामना  (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Icc t20 world cup 2020 fixtures venues and more nck

ताज्या बातम्या