T20 World Cup Semifinal IND vs ENG Playing XI: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सुपर १२ टप्प्यातील गट २ मध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला अॅडलेडमधील आजच्या उपांत्य फेरीचा विजेता मेलबर्नमध्ये रविवार पाकिस्तानशी सामना करणार आहे. काल टी २० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड सामन्यात पाकिस्तानी संघाने यंदाच्या सीझनचा सर्वोत्तम खेळ दाखवून विजय मिळवला. आज भारत विरुद्ध इंग्लंड सामना होण्याआधी टीम इंडियासमोर काही पेचप्रसंग उभे राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दिनेश कार्तिक विरुद्ध ऋषभ पंत’ या वादावर चर्चा सुरु असताना आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही संघ निवडीवर आपले स्पष्ट मत मांडले आहे. ज्या मैदानावर तुलनेने कमी चौकार लागण्याची शक्यता आहे, त्या मैदानावर, पंत आणि कार्तिक एकत्र खेळत असले तरीही, भारत अतिरिक्त फलंदाजासह आणि हार्दिक पांड्याचा पाचवा गोलंदाज म्हणून वापर करून मैदानावर उतरू शकतो, असे गावस्कर यांनी म्हंटले आहे.

आज तकशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, “भारतीय संघाला आपल्या गोलंदाजांची फळी मजबूत करण्याकडे लक्ष द्यायला हवे. दोन स्पिनर्सना खेळवण्याची गरज आहे का? एका स्पिनरच्या जागी एक फलंदाज खेळवता येऊ शकतो का? पंत व कार्तिक दोघे संघात असतील तर? सूर्यकुमार चौथ्या स्थानावर, ५ व्या स्थानी पंत, ६व्या स्थानी पंड्या व ७ व्या स्थानी कार्तिक, फलंदाजीची बाजू याने आणखीन बळकट होऊ शकते.

हार्दिक पंड्या अष्टपैलू आहे त्यामुळे त्याला पाचवा गोलंदाज म्हणून वापरता येऊ शकतं. अतिरिक्त गोलंदाज घेतल्यास, फिरकीपटूंसाठी चौकार लहान आहेत अशावेळी हर्षल पटेलचा विचार केला जाऊ शकतो”.

Video: आनंद महिंद्रा यांनी चक्क कुत्र्याला विचारलं T20 World Cup फायनलचं भविष्य; उत्तर ऐकाल तर..

अक्षर पटेलच्या ऐवजी हर्षल पटेल पर्याय ठरू शकतो का यावर गावस्कर म्हणाले की, जर तुम्ही अक्षर पटेलला 1-2 ओव्हर्स देत असाल, त्याची पूर्ण ओव्हर वापरू शकत नसाल, तर त्याला निवडण्याची गरजच काय? तो ७व्या क्रमांकावरही धावा काढत नाही. तो एक चांगला खेळाडू आहे, तो वेस्ट इंडिजमध्ये चांगला खेळला, पण जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नसाल, तर तुम्ही असा गोलंदाज निवडावा ज्यावर तुम्ही अवलंबून राहू शकता

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng playing xi rohit sharma criticized by sunil gavaskar over hardik pandya t20 world cup todays match update svs
First published on: 10-11-2022 at 09:53 IST